नवीन नांदेड। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विष्णुपूरी नांदेड येथील दोन कुं.अश्लेषा केंद्रे व कुं. सृष्टी शरद सोनटक्के या दोन विधार्थीनीची हवाई सहल२०२३ साठी अंतरिक्ष केंद्र श्रीहरीकोटा आंध्र प्रदेश येथे निवड झाली आहे.
औरंगाबाद विभागातील जिल्हा परिषदेच्या शाळामधील इयत्ता पाचवी ते आठवीच्या गुणवंत विद्यार्थ्यांची आंतरिक्ष केंद्र श्रीहरीकोटा ,आंध्रप्रदेश तसेच थुंबा स्पेस म्युझियम बेंगलोर ,वीरेश्वरय्या इंडस्ट्रियल अँड टेक्निकल म्युझियम तिरुअनंतपुरम या ठिकाणाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी शाळास्तर,केंद्रस्तर, तालुकास्तर व जिल्हा स्तरावरील चाळणी परीक्षेतून निवडून येणाऱ्या गुणवंत मुलांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, संशोधन वृत्तीचा विकास व्हावा,शास्त्रज्ञाच्या कार्यपद्धतीची जवळून ओळख व्हावी ,शास्त्रज्ञ निर्मितीस हातभार लागावा, विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील संशोधन प्रक्रियेची माहिती मिळावी या हेतूने आयुक्त कार्यालय औरंगाबाद व शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पाचवी ते आठवी वर्गात शिकणाऱ्या मुलांच्या पात्रतेची चाळणी परीक्षा घेण्यात आली.
सदरील आयोजित परीक्षेत जि.प.हा.विष्णुपूरी प्रशालेच्या कु.अश्लेषा दत्ता केंद्रे व कु.सृष्टी शरद सोनटक्के या दोन विद्यार्थिनींची निवड झाली आहे.
जिल्हास्तरीय परीक्षेस एकूण 167 विध्यार्थी पात्र ठरले होते. त्यापैकी अंतिम 50 यशस्वी स्पर्धकात अश्लेषा केंद्रे व सृष्टी सोनटक्के हीची निवड झाली आहे.पात्र विद्यार्थीनीचे शालेय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष विलासराव देशमुख हंबर्डे, माजी जि.प.सदस्य साहेबराव हंबर्डे, विश्वनाथ हंबर्डे, क्रियाशील पालक राजेश हंबर्डे, मुख्याध्यापक एन. एन. दिग्रसकर, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी, विज्ञान शिक्षक शिवाजी वेदपाठक, उदय हंबर्डे,कृष्णा बिरादार ,आनंद वळगे ,सोमनाथ बिदरकर ,एम ए खदीर ,सदानंद ग्रुरुपवार, श्रीपाद बोरीकर , डी के .केंद्रे, पद्माकर देशमुख,उद्धव धनगे,पाटील ,कविता कलेटवाड, वैशाली कुलकर्णी, पटवे मॅडम, मीरा रेवनवार,प्रीती कंठके,शिवनंदा माट्रोल,पाईकराव आदी शिक्षकांना अभिनंदन केले.