
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित व्यंकटेश नगर नायगाव येथील स्वामी समर्थ मंदिरात प्रकट दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


त्या निमित्ताने दर्शनासाठी व महाप्रसादासाठी असंख्ये भाविकांनी गर्दी केली स्वामी समर्थ सेवा एकात्मिक विकास बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित नायगाव येथील व्यंकटेश नगर मध्ये स्वामी समर्थ मंदिरात प्रकट दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 6 वाजता स्वामी याग यज्ञ , सकाळीं 8 वाजता भूपाळी व आरती, 8,30 वाजता स्वामी समर्थांची पालखी टाळ मृदंगाच्या गजरात वाजत गाजत मुख्य रस्त्यावरून महिला पुरुष यांच्या सह मिरवणूक सोहळा काढण्यात आला होता.


सकाळी 10,30 वाजता महाआरती करण्यात आले, दुपारी 11,00 वाजता मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भक्ती गीतांचा कार्यक्रम प्रसिद्ध संगीतकार हाके सर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांनी महाप्रसाद व दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

