
नांदेड/हदगाव। नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील शासनाचा नाफेड हरभरा (चना) खरेदी विक्री संघाच्या वतीने खरेदी करण्यात येत आहे. पंरतु हरभरा खरेदीत मनमानी कारभार चालवीला जात आहे. यास काही गोडबोले संचालक जिम्मेदार असून, त्यात एका संचालकाबद्दल हदगांव- हिमायतनगर तालुक्यात ओरड होत आहे. विशेष या संचालकाच्या खरेदी विक्री संघाच्या संपत्तीची विल्लेवाट लावण्यात मोठा वाटा असल्याचा आरोप तक्रारकर्ते शिवाजी देशमुख यांनी करून या कारभाराची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हा उपनिबंधक नांदेड, सहाययक निबंधक हदगाव यांच्याकडे करून या संदर्भातील अधिकृत माहिती मागितली आहे.


हदगाव तालुका खरेदी विक्री संघात हरभरा खरेदीत मनमानी हमाली लावणे, अनुक्रमे यादीत घोळ करत संचालक, त्यांचे नातेवाईक, तथाकथीत व्यापारी व मर्जीतील शेतकर्याना पहिला नंबर लावण्याची भूमिका घेणाऱ्या संचालकाच्या नावाने अनेकदा वर्तमान पत्रात बातम्या प्रकाशित झाल्या. त्यानंतर देखील याच संचालकाने शुक्रवारी मनमानी करत प्रति क्विटंल ७०रु.हमाली वाढवली होती. पण हदगांव येथील कर्तव्यदक्ष शेतकरी व पत्रकार शिवाजी देशमुख यांनी तात्काळ दघल घेत या संबंधित शासनाकडे तक्रार करत हा डाव हानुन पाडून शेतकऱ्यांचे हित जोपासत न्याय मिळून दिला.


पण हरभरा खरेदीसाठी यादीत झालेला घौळ,अनामत रक्कम ऊचल, शासनाने नोंदीचे परत पैसे पाठवले ते कुठे आहेत..? असा सवाल उपस्थित करत दोन -तिन वर्ष पूर्वी शेतकऱ्यांकडून विना पावती वाहतुकी पोटी पैसे जमा करण्यात आले, ते कुन्हाच्या खिशात आहेत. असे घौटाळे सदरील संचालकाने कोणाच्या आशीर्वादाच्या बळावर केले. अश्या प्रकारे मनमानी कारभार करणाऱ्या त्या संचालकांचा त्रास नाहक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. असा आरोपही पत्रकार शिवाजी देशमुख यांनी करून या संदर्भातील अधिकृत माहिती जिल्हा उपनिबंधक नांदेड, सहाययक निबंधक हदगाव, खरेदी विक्री संघ व्यवस्थापक हदगाव, यांना मागितली असून, या गैरकारभाराची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा असेही त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.


सदर संचालकाने अनेक वर्षापूर्वी तळणी कापूस खरेदी केंद्रावर वजन काट्यात घौळ करून शेतकर्याची लुबाडणू केली होती. हा सर्व प्रकार हदगांव तालूक्यातील शेतकर्याना माहिती आहे. ”तोच हा संचालक आता हदगाव खरेदी विक्री संघात हेराफेरी करून शेतकऱ्यांना त्रास देतो आहे. या संचालकाने सर्वाशी गोड बोलण्यात प्राविण्य मिळवले असून, या “गोड” वार साहेबानी हदगाव खरेदी विक्री संघाला अनेक वर्षापासून कुरण बनवले आहे. यांच्या पाठिशी स्वत:ला शेतकर्याचे कैवारी म्हणून घेणारे राजकिय नेते खंबीर पणे असल्याने या संचालकांच्या दुष्टचक्रात शेतकरी राजा हैराण झाला असल्याचे तक्रारकर्ते शिवाजी देशमुख यांनी म्हंटले आहे.