Tuesday, June 6, 2023
Home माहूर पाच वर्षीय आयात दोसानीचा आयुष्यातील पहिला रोजा -NNL

पाच वर्षीय आयात दोसानीचा आयुष्यातील पहिला रोजा -NNL

by nandednewslive
0 comment

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकुर। इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहे. या महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षाच्या पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचे ) असतात. लहानपासून मोठ्यापर्यंत या महिन्यांमध्ये रोजा धरत असतात.

पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात. अशाच प्रकारे माहूर येथील उद्योजक जुनेद दोसानी यांची ५ वर्षीय मुलगी आयात दोसानी या चिमुकली ने ही आपल्या जीवनातील पहिला रोजा आज शनिवार दिनांक २५ रोजी पूर्ण केला.

मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता ही उपवास ठेवला जातो या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रास होतो त्यात या पाच वर्षांची चिमुकलीने पहिला रोजा ठेवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठेवला त्यामुळे आयात या ५ वर्षीय मुलीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!