
नांदेड। थकीत कराच्या वसुलीसाठी मनपा आयुक्त डॉ सुनिल लहाने यांच्या निर्देशानुसार मोबाईल टॉवरची कर न भरणाऱ्या विरुद्ध महानगरपालिकेची धडक कारवाई सुरू करण्यात आली असून, यात आज दोन मोबाईल टॉवर सिल करण्यात आल्याने कर न भरणाऱ्या व्यवसायिकात खळबळ उडाली आहे.


शहरात वेगवेगळ्या मोबाइल कंपन्यांचे १८० हून अधिक टॉवर आहेत. यातील अनेक कंपन्यांकडे महापालिकेचा मालमत्ता कर थकलेला आहे. थकीत कराच्या वसुलीसाठी आयुक्त डॉ सुनिल लहाने यांच्या निर्देशानुसार मोबाईल टॉवरची कर वसुली मोहीम सुरुवात आहे. त्यानुसार उपायुक्त (कर) डॉ पंजाब खानसोळे यांनी मागील महिन्यात मोबाईल टॉवर प्रतिनिधी ची बैठक घेऊन त्यांना कर भरणा करण्याच्या सुचना दिल्या होती. तसेच पुनश्च एकदा थकीत कर भरणे बाबत नोटीस बजावण्यात आली होती. परंतु नोटीस दिल्यानंतरही प्रतिसाद मिळत नसल्याने मा.आयुक्त डॉ सुनिल लहाने,अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या निर्देशानुसार उपायुक्त (महसूल) डॉ पंजाब खानसोळे यांनी क्षेत्रीय अधिकारी व कर वसुली पथकांना सक्त कार्यवाही कारणे बाबत आदेशित केले होते.


त्यानुसार आज रविवारी क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 4 वजीराबाद अंतर्गत आज दि.26.3.2023 रोजी 4.1.64m एअरटेल मोबाईल टॉवर जुना मोंढा येथील ब्रिजकिशोर कचरूलाल धूत यांच्या मालमत्तेवरील एअरटेल टाॅवर वर रु. 5,44,165/ व इतवारा भागात उमराव चव्हाण यांच्या मालमत्ते वरील एअरटेल मोबाईल टॉवर वर रु.6,19,617/कर थकीत असल्याने सहाय्यक आयुक्त संजय जाधव व हरदिपसिंग सुखमणी, गोपाळ चव्हाण, रजनीकांत सुनेवाड,शरद काळे, व्यंकट गायकवाड,शेख जहांगीर व पथकाने दोन्ही एअरटेल मोबाईल टाॅवरचे लाईट कनेक्शन खंडित करण्यात आले आहे व दोन्ही इलेक्ट्रीक रुमला सिल करण्यात आले आहे.


शहरातील सर्व मोबाईल टॉवर धारकांनी थकीत असलेल्या महापालिकेच्या कराचा भरणा तात्काळ करावा अन्यथा पुढील २४ तासात थकबाकी धारका विरुद्ध सक्त कार्यवाही करण्याचे आदेश उपायुक्त(कर व महसूल) डॉ पंजाब खानसोळे यांनी क्षेत्रीय अधिकारी यांना दिल्या आहेत .तसेच कार्यवाही केल्यानंतर शास्ती माफी योजनेचा लाभही मिळणार नाही याची सर्व टॉवर धारकांनी नोंद घ्यावी.
