
नांदेड। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हाद्दीतील जंगमवाडी चौक पाॅवर हाउस ते शेतकरी चौक तरोडा नाक्यापर्यंतच्या रस्त्यावरील १२ मीटर रस्ता रुंदीकरणासाठी बाधीत मालमत्ता पाडापाडीचे काम दिनांक १८/०२/२०२३ पासून सुरु करण्यात आले आहे.


या रस्त्यावरील १२ मीटरसाठी एकुण ८१ मालमत्ता बाधीत होत असुन आजपर्यंत ७८ मालमत्ता पाडापाडीचे काम करुन रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नाली व रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. परंतु सदरील रस्त्यावरील दोन मालमत्ता धारकांनी आपल्या मालमत्ता पाडापाडीसाठी अनावश्यक अडथळा आणत आहेत.


त्या दोन मालमत्ता धारकांची नावासह रीतसर तक्रार पोलीस निरीक्षक यांच्याशी चर्चा करून भाग्यनगर पोलिस ठाण्यात देउन आज रविवारची सुट्टी असताना सुद्धा कामाची तातडी लक्षात घेऊन आज भाग्यनगर पोलिस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात चार दुकानाचे बाधीत क्षेत्र पाडण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. उर्वरित एक मालमत्ता येत्या दोन दिवसात पाडण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.


सदरची पाडापाडीची कार्यवाही डॉ. सुनील लहाने आयुक्त मनपा नांदेड. गिरीश कदम अतिरिक्त आयुक्त मनपा नांदेड. डॉ. पंजाबराव खानसोळे उपायुक्त मनपा नांदेड. यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश शिंगे नियंत्रक अतिक्रमण विभाग मनपा नांदेड आणि भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी यांच्या उपस्थितीत व कंत्राटी खाजगी कामगार व एक जेसीबी मशीन. मार्फत करण्यात आली आहे.
