
उस्माननगर, माणिक भिसे। हाळदा ता.कंधार येथील सरपंच हानुमंत शेटीबा हाळदेकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत उस्माननगर पोलीस ठाण्यात तक्रारदार व इतर कामानिमीत्त येणाऱ्या नागरीकांना उन्हाळ्यात पिण्यासाठी थंड पाणी मिळावे या उदात्त हेतुने पोलिस स्टेशनला वॉटर कुलर भेट दिला आहे.


उन्हाळ्यात अंगाची लाही लाही होत असते. उन्हाची तीव्रता जाणवनार आसल्याने परिसरातील नागरिकांची तहान भागवावी या सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून हाळदेकर यांनी जन सेवा हिच आमची सेवा या ब्रीद वाक्यानुसार भविष्यात येणाऱ्या नागरिकांना थंट पाणी पिण्यायोग्य मिळणार आहे. तजेवनापेक्षा पाणि आवश्यक आहे. उस्माननगर हे बावन्न गावचे पोलीस ठाणे आहे .


कामानिमित्त येना-या नागरिकांची संख्या भरपुर आहे. हाळदेकर यांनी कुलर भेट देऊन सगळ्यांचा आशीर्वाद मीळवण्याचे काम केले आहे. याबद्दल एपीआय पी.डी. भारती , पीएसआय. पल्लेवाड, पीएसआय गाडेकर व सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

