
धर्माबाद। शहरातील मोंढा रोड येथील तिवारी डिपि हटवणे अत्यंत गरजेचे आहे. 23 वर्षा पूर्वी बसवण्यात आलेली ही डिपि आज रहदारी वाढल्याने गाड्याचे प्रमाण वाढल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


सर्व सामान्य नागरिकांना झळ पोहचु नये कारण मुख्य रस्त्यावर असल्याने व मागे च जिल्हा परिषद ची शाळा असल्याने विद्यार्थी साठी पण सदरील डिपि धोकादायक आहे. सदरील रोडवर खताची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. मोठे ट्रक सुद्धा या रोड वरुनच जातात विशेष म्हणजे शहरात प्रवेश करताना हाच रोड आहे. नेहमीच मोंढा रोडवर वर्दळ असते. भविष्यात होणारा अपघात टाळण्यासाठी सदरील तिवारी डिपी हटवणे अतिशय आवश्यक आहे.


सदरील डिपि सध्या 100 kv क्षमतेचे आहे. सदरील डिपिवर किंवा त्यांच्या शेजारी 200kv क्षमतेचे ट्रांसफारमर बसवण्याचा घाट सुरू आहे. 200 kv चा ट्रांसफारमर बसवणे मुख्य रस्त्यावर धोकादायक आहे. सर्व सामान्य जनतेच्या जीवाशी खेळणे चुकीचे आहे म्हणून कोणत्याही परिस्थितीत त्या जागी डिपि बसवणे धोकादायक आहे. सदरील डिपि हटवण्याचे व दुसरी कोणतीही डिपि बसवू नये अशी मागणी सर्व सामान्य जनतेतून होते आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते रमेश तिवारी यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन तशी मागणी केली आहे.


गोदाचा प्लाट व जिल्हा परिषदची जागा यात दहा फूट शेरि आहे तो रस्ता स्वामी समर्थ केंद्र कडे जाणारा आहे. सदरील 200 केव्हीचा डिपिला जाहीर प्रगटन न काढता विद्युत विभाग कामाची परवानगी कस काय देतोय काय..? गौड बंगाल आहे.
