
नांदेड। शहरात वेगवेगळ्या मोबाइल कंपन्यांचे १८० हून अधिक टॉवर आहेत. यातील अनेक कंपन्यांकडे महापालिकेचा मालमत्ता कर थकलेला आहे. थकीत कराच्या वसुलीसाठी आयुक्त डॉ सुनिल लहाने यांच्या निर्देशानुसार मोबाईल टॉवरची कर वसुली मोहीम सुरुवात आहे.


त्यानुसार उपायुक्त (कर) डॉ पंजाब खानसोळे यांनी मागील महिन्यात मोबाईल टॉवर प्रतिनिधीची बैठक घेऊन त्यांना कर भरणा करण्याच्या सुचना दिल्या होती. तसेच पुनश्च एकदा थकीत कर भरणे बाबत नोटीस बजावण्यात आली होती. परंतु नोटीस दिल्यानंतरही प्रतिसाद मिळत नसल्याने मा.आयुक्त डॉ सुनिल लहाने,अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या निर्देशानुसार उपायुक्त (महसूल) डॉ पंजाब खानसोळे यांनी क्षेत्रीय अधिकारी व कर वसुली पथकांना सक्त कार्यवाही कारणे बाबत आदेशित केले होते .


आज दि.27.3.2023 रोजी क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 5 इतवारा अंतर्गत येथील राजेश्वर लच्छिराम यमुना यांच्या मालमत्तेवरील विजन टाॅवर वर रु. 19,28,979 / व ब्रिजकिशोर कचरुलाल धुत यांच्या मालमत्ते वरील BSNL मोबाईल टॉवर वर रु. 8,09,941/कर थकीत असल्याने इतवारा कर वसुली पथकाने दोन्ही मोबाईल टाॅवरचे फायबर पावर युनिट सिल करण्यात आले आहे. इतवारा अंतर्गत क्षेत्रीय अधिकारी रावण सोनसळे , जी.जी.तोटावार, जुल्फेखार अहमद ,वहीदु जमा,सांबरे व वसुली पथकाने ही कारवाई केली.


शहरातील सर्व मोबाईल टॉवर धारकांनी थकीत असलेल्या महापालिकेच्या कराचा भरणा तात्काळ करावा अन्यथा थकबाकी धारका विरुद्ध सक्त कार्यवाही करण्याचे आदेश उपायुक्त(कर व महसूल) डॉ पंजाब खानसोळे यांनी क्षेत्रीय अधिकारी यांना दिल्या आहेत .तसेच कार्यवाही केल्यानंतर शास्ती माफी योजनेचा लाभही मिळणार नाही याची सर्व टॉवर धारकांनी नोंद घ्यावी.
