
वडगांव/पोटा, पांडुरंग मिराशे। हिमायतनगर तालुक्यातील वडगाव खुर्द येथे दिनांक 30मार्च रोज गुरुवारी अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण,व भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे तर दिनांक 06एप्रिल रोज गुरुवारी काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.


भैरवनाथ कृपेने गेले पंधरा वर्षापासून मौ.वडगाव खुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताह चालू असून यंदा भागवत कथेचे आयोजन केले आहे भागवत कथा प्रवक्ते ह भ प सोपान महाराज आहेरवाडीकर तर ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ शिवाजी महाराज वडगावकर हे सांभाळणार आहेत. सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम सकाळी चार ते सहा काकडा भजन, सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण ,दुपारी बारा ते चार संगीत भागवत कथा, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ, रात्री साडेआठ ते साडेदहा हरिकीर्तन, रामनवमी निमित्ताने दिनांक30 रोज गुरुवार सकाळी दहा ते बारा ह भ प बालाजी महाराज आळंदीकर यांचे हरिकीर्तन होईल .दिनांक 30 मार्च रोज गुरुवार ह भ प पंढरीनाथ महाराज पळसगावकर यांचे रात्री कीर्तन होईल. दिनांक 31 मार्च रोज शुक्रवार ह भ प दीनानाथ महाराज आळंदीकर यांचे रात्री हरी कीर्तन होईल.


दिनांक 1 एप्रिल रोज शनिवार ह भ प प्रभाकर बाबा कपाटे श्रीकृष्ण मंदिर भोकर यांचे रात्री हरी किर्तन होईल. दिनांक 2 एप्रिल रोज रविवार ह भ प पंजाबराव महाराज चालगणीकर यांचे रात्री हरी किर्तन होईल. दिनांक 3 एप्रिल रोज सोमवार ह भ प शहा दत्त महाराज दत्त मठ सरेगाव यांचे रात्री हरी कीर्तन होईल. दिनांक 4 एप्रिल रोजी मंगळवार ह भ प माधव महाराज गुरुजी वडगावे धर्माबाद यांचे रात्री हरी कीर्तन होईल. दिनांक 5 एप्रिल रोज बुधवार ह भ प नंदकिशोर महाराज अजरसोंडेकर यांचे रात्री हरी किर्तन होईल. दिनांक 6 एप्रिल रोजी गुरुवार ह भ प सोपान महाराज आहेरवाडीकर यांचे सकाळी दहा ते बारा या वेळेत काल्याचे किर्तन व नंतर महाप्रसाद होईल.


सप्ताहातील गुणी भजनी मंडळ मृदंगाचार्य गोपाळ महाराज ठाकरे गायनाचार्य वामन महाराज मारेगावकर, बंडू पाटील चिंचाळकर परसराम पाटील चिंचाळकर ,नामदेव महाराज वडगावकर, शिवानंद येवलीकर तर संगीतमय भागवत कथेतील गुणी भजनी तबलावादक शंकर महाराज रिधोरेकर पॅड वादक वैभव महाराज मार्कंडेकर शिंधवादक बाळकृष्ण महाराज कंठेश्वरकर गायक जनार्धन महाराज वाईकर, पोटा बुद्रुक, पोटा खुर्द ,पारवा बु,पारवा खुर्द ,मोरगाव, दाबदरी ,सोनारी, वडगाव ,टाकराळा ,काढली ,दरेगाव ,आधी ठिकाणातील गुणी भजनी मंडळी रात्री जागरणासाठी उपस्थित राहणार आहेत या अखंड हरिनाम सप्ताह मधील धार्मिक कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा परिसरातील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आव्हान समस्त गावकरी मंडळी वडगाव खुर्द वाशीयांनी केले आहे.
