
नांदेड। महाराष्ट्र शासन व धर्मदाय आयुक्त मुंबई यांच्या निर्देशनानुसार नांदेड येथे नांदेड येथे दि. २३ एप्रिल २०२३ रोजी सर्व धर्मीय सामुहिक विवाह मेळावा आयोजित करण्यात आला असून, या सामुहिक विवाह सोहळ्याची जयत तयारी सुरू झाली आहे.


कौठा येथील शहीद बाबा दिप सिंघजी गुरुद्वारा च्या प्रांगणात हा विवाह सोहळा होणार असून 51 विवाह लावण्यात येणार आहेत. आतापर्यंत 11 विवाह नोंद करण्यात आले आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी, शहीद जवान, अंध, अपंग, निराधार, कोरोना काळात मरण पावलेले आधारप्रमुखाचे आपत्य व इतर गरजुंचे विवाह विनामुल्य ५१ विवाह लावण्याचा संकल्प आहे.


तसेच प्रत्येक वर-वधूंना सोन्याचे मणीमंगळसुत्र, चांदीचे जोडवे, विरोधा, पैंजन, व लग्नाचा शालु घुंगट, व लग्नाला लागणारे सर्व साहीत्य व मुलीला आर्थिक स्वालंबनासाठी ओव्हर लॉक शिलाई मशिन देण्यात येणार आहे. व वराकरीता सफारी ड्रेस, टॉवेल टोपी, फेटा, व वराकरीता लागणारे सर्व साहीत्य व वर-वधुचे प्रत्येकी ५ लाखाचा विमा काढण्यात ययेणार आहे. विवाह प्रत्येक धर्माच्या रितीरिवाजा प्रमाणे लावले जातील. विवाह नोंदणीसाठी नांदेड जिल्ह्यातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. वधू-वराची नोंदणी मोजकीच शिल्लक आहेत. इच्छुकांनी विवाह नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.


दरम्यान विवाह सोहळा संयोजन समिती ची मातोश्री कॅम्पस मध्ये बैठक घेण्यात आली.. या बैठकीला धर्मादाय उपायुक्त किशोर मसने,मेळावा समितीचे अध्यक्ष सुधाकर टाक, सचिव मिनलताई पाटील खतगावकर,शारदा भवन शिक्षण संस्थेचे सचिव प्रा डॉ रावसाहेब शेंदारकर,मातोश्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष कामाजी पवार, शिवाजी पवार,काळेश्वर संस्थान चे सचिव शंकरराव हंबर्डे, बालाजी पांडागळे,राज गोडबोले, नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे, डॉ श्रीनिवासन, डॉ सोपान क्षीरसागर,डॉ विजय बंडेवार, सौ सुषमा गहेरवार, सौ जयश्री जैस्वाल, प्रा व्ही इस भिसे, ऍड जयवंत गाजभारे, निखील कवळे, सतीश अलंपल्लेवार, सौ कुसूम देशमुख, ऍड जी बी देवकते, ऍड बी जि मोरे, संजय शर्मा, ऋषिकेश पारवेकर, गोविंद पोटजळे, प्रवीण पेन्शनवार, बाबाराव भाले, सदाशिव स्वामी,साहेबराव झाम्बरे, प्राचार्य शहाजी देशमुख, डीन काझी सर,शिवाजी राजे पाटील,प्रवीण किणीकर हे उपस्थित होते.
