
नांदेड। ज्या क्षणाची रामभक्त वाट पाहत होते तो क्षण श्रीराम जन्मोत्सव 30 मार्च गुरुवार रोजी आलेला आहे. श्रीराम जन्मोत्सव निमित्त विश्व हिन्दू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती व दुर्गा वाहिनी तर्फे याही वर्षी भव्य मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे.


मोटर सायकल रॅली 30 मार्च गुरुवार रोजी सकाळी 9 वाजता श्री पंचवटी हनुमान मंदिर महावीर चौक, हनुमान पेठ येथे आरती होऊन ही रॅली मुथा चौक, हनुमान पेठ -शिवतीर्थ -चिखलवाडी -अणणाभाऊ साठे चौक -आनंद नगर -भाग्य नगर -वर्कशॉप -राज कॉर्नर -शेतकरी चौक -श्री गजानन महाराज मंदिर,मालेगाव रोड ह्या मार्गाने निघणार आहे.


ह्या शोभायत्रे मध्ये हिन्दू धर्माची शान भगवे ध्वज हे मुख्य आकर्षण राहणार आहे.सम्पूर्ण रॅली भगव्या वातावरणात श्रीराम नामाच्या उदघोशात हिन्दू महागर्जना मनून निघणार आहे.ह्या मोटर सायकल रॅली मध्ये मातृशक्ती व दुर्गाशक्ती ची मोठया प्रमाणात उपस्थिती राहणार आहे.


पहिल्या 500 मातृशक्ती व दुर्गा शक्ती ना फेट्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरीही जास्तीत जास्त बजरंगी,रामभक्त,मातृशक्ती व दुर्गाशक्ती व सखल हिन्दू समाजाने जास्तीत जास्त संख्येने ह्या भव्य मोटर सायकल रॅली मध्ये सहभागी व्हाव्हे अशे आवाहन विश्व हिन्दू परिषद, बजरंग दल, दुर्गावाहिनी, मातृशक्ती यांच्या तर्फे करण्यात येत आहे.
