
हिमायतनगर। देशसेवा करण्यासाठी आपल्या एकुलत्या एक असलेल्या मुलाला देवाची सेवा करण्यासाठी गेलेले भारतीय जवान धोंडीबा एटलेवाड यांच्या आई वडिलांचा सन्मान भागवत कथाचार्य प. पू. बालयोगी गजेंद्र महाराज यांच्या हस्ते करण्यात आला आहे.


कारला येथील शेतकरी कुटुंब असलेल्या किसन एटलेवाड यांचा एकुलता एक असलेला मुलगा धोंडीबा एटलेवाड हा दोन वर्षांपूर्वी इंडीयन आर्मी मध्ये दाखल झाला आहे. सध्या अखंड हरिनाम सप्ताह व संगीत भागवत कथा गावात सुरू असुन या सप्ताह सोहळ्यात देशसेवा करण्यासाठी गेलेल्या जवान यांच्या आई वडिलांचा शाल श्रीफळ देऊन बालयोगी गजेंद्र चैतन्य महाराज यांच्या हस्ते सन्मान केला आहे. गजेंद्र चैतन्य महाराजांनी केलेल्या सत्कार प्रसंगी जवान यांच्या आई वडिलांचे अश्रू अनावर आले होते.


यावेळी सत्कार प्रसंगी गजेंद्र चैतन्य महाराज म्हणाले की ग्रामीण भागातील शेतकरी बांधव आपल्या एकुलता एक असलेल्या रत्नाला भारत मातेच्या देशसेवा करण्यासाठी पाठवले आपल्यावर जन्मभूमीचे आनंत उपकार आहेत.आणि त्या भुमीचे ॠन फेडण्याकरीता आपला एकुलता एक रत्न देशाच्या सेवेसाठी पाठवला एका आई आणि वडिलांसाठी अतिशय सन्मापुर्वक बाब आहे.


धोंडीबा एटलेवाड या तरुणांचा आदर्श इतरांनी देखील घ्यावा समाजासाठी देशासाठी आपण काही तरी केले पाहिजे हि भावना प्रत्येकाच्या मनात पाहिजे असेही महाराज म्हणाले. यावेळी प्रा. मारोती देवकर, केशव रासमवाड, नाथा चव्हाण, मारोती पाटील, सरपंच गजानन कदम, सोपान बोंपीलवार, आनंद रासमवाड, उत्तम मिराशे,शिवाजी एटलेवाड, गोपीनाथ पाटील,वसंत मिराशे, दता चिंतलवाड,बालाजी मोरे, मारोती ढाणके, माधव पाटील विरसणी,भिमराव लुम्दे, लक्ष्मण ढाणके, ओम मोरे, लक्ष्मण चिंतलवाड, आनंद सुर्यवंशी, जांबुवंत मिराशे, यांच्यासह गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
