
हिमायतनगर। कृषी उत्पन्न बाजार समिती हिमायतनगर (वाढोणा) निवडणुकीच्या अनुषंगाने आज भाजपा -बाळासाहेबाची शिवसेना युती जाहीर करण्यात आली आहे. नांदेडचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, मा.केंद्रीय मंत्री सुर्यकांताताई पाटील, हिंगोलीचे खा हेमंतभाऊ पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, हादगाव/हिमायतनगरचे नेते बाबुराव कदम कोहळीकर यांच्या सूचनेवरून आज संयुक्तिक बैठक घेऊन श्री परमेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन श्री चरणी नारळ फोडून निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज घेण्यात आले.


यावेळी वरिष्ठ दोन्ही पक्षातील नेतेच्या सूचनेवरून भाजपाचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सरपंच सुधाकर पाटील सोनारीकर, शिवसेना ज्येष्ठ नेते विजयराव वळसे पाटील, बालाजी राठोड, राजु पाटील पिंपरीकर, किशनराव पाटील वानखेडे, खंडू चव्हाण, राजू पाटील शेलोडेकर, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी, युवासेना तालुका प्रमुख सरपंच ॲड.बाळा पतंगे खैरगावकर, मा.सभापती लक्षण जाधव, सि.एन कदम, संचालक राम पाकलवार, मधुकर पांचाळ, संतोषराव कदम, गजानन हडपकर, सरपंच गौतम दवणे, सरपंच पवन करेवाड, सरपंच जीवन जैस्वाल, सुभाष माने, ज्ञानेश्वर शेवाळे, कल्याण ठाकूर, गजानन गोपेवाड, माधवराव कदम (M.D), प्रकाशराव हंपोलकर, शंकर बोरगडीकर, ज्ञानेश्वर पुठ्ठेवार, गौरव सुर्यवंशी, वामनराव पाटील, परमेश्र्वर सुर्यवंशी, शिवाजी झुकरे, अजय जाधव, विनोद दुर्गेकर, बाबाराव वाडेकर, व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

