
नांदेड। नुकत्याच झालेल्या इंटरनॅशनल इंग्लीश ओलंपियाडच्या परिक्षेत होलिसिटीच्या कु.मीमांसा रूपेश पाडमुखने सुवर्ण पदक मिळवले असून तिच्या यशाबद्दल प्रिन्सीपॉल मो.अर्शद सर यांच्यासह सर्व आप्तस्वकीयांकडून अभिनंदन केल्या जात आहे.


नांदेडपासून लगत असलेल्या पासदगांव येथील होलिसिटी पब्लीक स्कुलमध्ये इयत्ता सहावी वर्गात शिकत असलेल्या कु.मीमांसा पाडमुख हिने खेळासह इतर अॅक्टीव्हिटीमध्ये चांगलीच छाप पाडली आहे. शालेय खेळातही गोल्ड व ब्रॉन्झ पदक मिळवले असून अगोदरही तिने अनेक पदके मिळावली आहे.


नुकत्याच झालेल्या एसओएफ इंटरनॅशनल इंग्लीश ओलंपियाड परिक्षेत सुवर्णपदक मिळवले आहे. गोल्ड मेडल व सर्टिफिकेट देऊन तिचा सन्मान करण्यात आला. तिच्या यशाबद्दल प्रिन्सीपॉल मो.अर्शद सर, पवार सर, सौ.सुजाता नाईक, रश्मी मॅडम, स्वाती मॅडम यांच्यासह सर्व आप्त स्वकीयांकडून अभिनंदन केल्या जात आहे.


- सृष्टी जोगदंडची आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड… नांदेडच्या शिरपेचात मानाचा तुरा -NNL
- डोईफोडे जीवन गौरव पुरस्कार डॉ.सुधीर गव्हाणे तर युवा पत्रकारिता पुरस्कार विलास बडे यांना जाहीर -NNL
- श्री गुरुगोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयात ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात -NNL
- ऑल इंडिया सीरिजवर शिवतेज शिरफुलेचा कब्जा -NNL