
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगाव शहरातील पानसरे नगर येथील साईबाबा मंदिरात प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी रामनवमी जन्मोत्सव सोहळा दिनांक 28- 3 – 2023 रोज मंगळवार ते दिनांक 30- 3 – 2023 गुरुवारपर्यंत रामनवमी उत्सव साजरा करण्यात येत आहे तरी परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावे असे आवाहन साईबाबा मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.


साईबाबा मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम पहाटे 5:15 श्री ची काकड आरती पहाटे सहा वाजता श्री चे मंगलस्नान व दर्शन सकाळी आठ वाजता श्री चे नैवेद्य आरती दुपारी दहा-बारा 30 वाजता श्री ची मध्यारती दुपारी चार वाजता प्रवचन ह भ प प्राध्यापक जाधव सर नांदेड, सहा वाजता धुपारती रात्री आठ वाजता शेजारती, दुसरा दिवस बुधवार दिनांक 29- 3 – 2023 रोजी दैनंदिन कार्यक्रम पहाटे पाच वाजून पंधरा मिनिटांना श्री चे काकड आरती, पहाटे सहा वाजता श्री चे मंगल स्नान व दर्शन सकाळी आठ वाजता श्री नैवेद आरती दुपारी बारा तीस वाजता श्री ची मध्यान आरती दुपारी चार वाजता शिर्डी येथील कीर्तनाचे लाईव्ह प्रक्षेपण सायंकाळी सहा तीस वाजता धुपारती रात्री आठ वाजता शेजारती.


मुख्य दिवस व शुक्ल नऊ शके १९४५ गुरुवार 30- 3 – 2023 रोज दररोजच्या प्रमाणे पाच वाजून पंधरा मिनिटांनी ची काकड आरती पहाटे सहा वाजता श्री चे मंगलस्नान व दर्शन सकाळी आठ वाजता श्री चे नैवेद्य आरती सकाळी नऊ वाजता श्रीराम जन्म कथा व्याख्यान दुपारी बारा तीस वाजता मध्यान आरती दुपारी एक वाजता श्री चा महाप्रसाद दुपारी एक तिसरीची संगीत भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सदरील कार्यक्रमाचा सर्व साई भक्तांनी लाभ घ्यावे.

