उस्माननगर, माणिक भिसे। गोळेगाव ( तपोवन ) ता.लोहा येथील टी.पाॅंइन्ट जवळ अंधाराचा फायदा घेऊन दडून बसलेल्या तीन चोरट्यासह एक ओमेनी व्हॅन , मोटारसायकल अन्य हात्यार ,साहित्यासह जवळपास २६००००/ रूपयाचा मुद्देमाल सह पकडण्यात उस्माननगर पोलिसांना यश मिळाले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि २८/०३/२३ रोजी रात्री ०३.३० वा चे सूमारास आम्ही पो स्टे उस्माननगर हददीत गोळेगाव टी पॅाईन्ट येथे अंधारात एक ओमनी व्हॅन व एक मोटार सायकल आणि त्यांच्या आडोशाला तीन इसम संशईतरित्या दिसले. त्यांचेपैकी १) राजू भरत सोळंके वय १९ वर्षे रा. कूरूळा ता. कंधार २) अनिल गोविंद सोळंके वय २२ वर्षे रा. सेलगाव ता. लोहा ह्या दोघांना पकडले व एक ३) वामन माधव गरसोळे रा पेठशिवनी ता. कंधार हा पळून गेला.
त्यांचे ताब्यात चोरून आणलेले दोन बकरे, एक पॅशन प्रो मोटार सायकल, एक ओमीनी व्हॅन, एक चाकू व लॅाक तोडण्याची टामी असे एकूण २६०००० रूपयाचा मूददेमाल मिळून आला असून, ते सूर्यास्त ते सूर्योदयापूर्वी घरफोडीच्या साहित्य व दोन चोरीच्या बकऱ्यांसह मिळून आल्याने आमचे फिर्यादवरून त्यांचेविरूध्द कलम १२२, १२४ मूंपोका प्रमाणे गून्हा दाखल केला असून, पूढील तपास पोना/बालाजी राठोड हे करत आहेत. सदर आरोपींकडून मालाविरूध्दचे आणखी गून्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री अबिनाशकूमार अपर पोलीस अधीक्षक नांदेड, मा श्री मारोती थोरात उपविपोअ कंधार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि भारती, पोहेकॅा/मस्के, पोहेकॅा/रेजितवाड, पोना/बालाजी राठोड, पोकॅा/बलवान कांबळे यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.