
मुंबई। मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणारया रंगा आण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघासाठी रत्नागिरी जिल्हा पत्रकार संघाची निवड करण्यात आली आहे.. परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी आज येथे ही घोषणा केली.


मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी सर्वोत्कृष्ट काम करणारया तालुका आणि जिल्हा संघांना वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगा आण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.. आदर्श तालुका पत्रकार संघाची घोषणा यापुर्वीच करण्यात आली आहे.. आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार रत्नागिरी जिल्हा पत्रकार संघाला आज जाहीर करण्यात आला आहे.. येत्या ७ एप्रिल २०२३ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे होणारया सोहळ्यात राज्यात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या जिल्हा आणि तालुका संघांना सन्मानित करण्यात येणार आहे.


रत्नागिरी जिल्हा पत्रकार संघाने परिषदेने दिलेले उपक्रम तर राबविलेच त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रम राबवून पत्रकारांची प्रतिमा उंचविणयाचा प्रयत्न केला.. पत्रकार संघाने संगमेश्वर तालुक्यातील वांद्री हे गाव दत्तक घेऊन तेथील जनतेला सर्व प्रकारची आरोग्य व्यवस्था पुरविली.. अतिवृष्टीच्या काळात गरजूंना मोठी मदत केली.. तसेच राजकीय दबावाची पर्वा न करता जान्हवी पाटील, हेमंत वणजू, रत्नागिरी अध्यक्ष यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वारिशे हत्त्या प्रकरणात निर्णयाक भूमिका बजावत त्यांच्या कुटुंबीयांना मोठी मदत मिळवून दिली.


रत्नागिरीची निवड करताना या सर्व बाबींचा विचार केला.. एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई, कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी रत्नागिरी जिल्हा पत्रकार संघाचे, त्यांच्या पदाधिकारयांचे आणि सर्व सदस्यांचे अभिनंदन केले आहे.
