
हदगाव, शे. चांदपाशा। हदगाव तालुक्यात रेती उपसा करण्यायोग्य १५ते२० रेती घाट असुन, परंतु या रेती घाटाचे लिलाव होत नसल्याने माञ चोरट्या मार्गाने या रेती माफियानी सोन्याच्या भावात विकत असल्याने नाहक ञास गरीब लाभर्थाचे होत आहे.


विशेष म्हणजे शासनाच्या वतीने विविध शासकीय बांधकामे व घरकुलच्या योजना राबविल्या जात आहे. यात शासकीय कामावर मोठ्या प्रमाणात चोरट्या रेतीचा वापर होत आसताना दिसुन येत आहे. विशेष म्हणजे गरीब लाभर्थी घरकुल कसे साकारणार आहेत. असा जटील प्रश्न उपस्थित होत असतांना त्यांच्यावर माञ आर्थिक व उपसमारीचे संकट उभे टाकले असताना शासनाच्या पाच ब्रास चे रेती कडे सर्वाचे लक्ष लागलेले आहे.


हदगाव तालुक्यात रेतीघाटाचे लिलाव झालेले नाही परिणाम स्वरुप रेतीला प्रचंड प्रमाणात किमती वाढलेल्या आहे. काहीना रेती परवडणारी नसल्यामुळे बहुसंख्यकाचे घराचे बांधकाम रखडले आहे. त्यातच चोरटी रेती परवडणारी नसल्याने ह्या रेतीच्या गुणवत्ता बाबतीत मोठी साशंकता असते याचाच फायदा काही रेती विक्रेते घेत आहेत.


माती मिश्रित रेती व खळी मिश्रीत रेती पुरवल्या जात असुन यामुळे घराचे बांधकाम करणारे दुहेरी अर्थिक आडचणीत येत आहे. या बाबतीत शासनाने त्वरीत निर्णय घ्याव अशी मागणी जोर धरीत आहे..एक वर्षापुर्वी १०००रु ब्रास प्रमाणे मिळणारी रेती सध्या परिस्थितीत ४०००रु पर्यथा तेपणा राञी चोरट्या मार्गाने पुरविली जात आहे.

शासनाची वाळू केव्हा…?
पाच ब्रास मोफत वाळू उपलब्ध करुन देण्यात येईल अस शासना द्वरे घोषणा झाली होती. त्याची अमलबजावणी केव्हा होणार अस नागरिकात बोलल्या जात आहे.

नदीकाठावरील गाव..!
हदगाव तालुक्यात नद्या वाहत आसुन पुर्वी या गावात कधी ही रेतीचा तुटवडा नसयाच आता महसुल पोलिस विभागाच्या धाडीत ट्रक्टर किवा अन्य वाहने पकडली जातील व एक लाख दहा हजाराचा दंड ठोठवला जाईल या भितीने आता नदीकाठच्या गावात ही रेती टंचाई जाणवत आहे.

कञाटदाराच्या मते…!
गेल्या १०ते१५ वर्षापासुन आम्ही घराचे बांधकाम करित असुन, रेती अभावी बांधकामे थांबली नव्हती. माञ या वर्षी बाधकामे बंद ठेवावी लागत आहे. यामुळे रोजगार उपलब्ध होत नसल्याने पोटपाण्याचा प्रश्न निर्माण झालेलं आहे. अनेक बांधकाम कञाटदार करत आहेत.