
लोहा| सोनखेड पोलीस ठाण्यातील एएसआय आनंदराव रामजी नरवाडे यांची पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) म्हणून पदोन्नती झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी हे आदेश काढले.


सोनखेड येथे कार्यरत असलेले आनंदराव नरवाडे याना पीएसआय म्हणून पदोन्नती मिळाली आहे. सोनखेडचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल भोसले, यांनी त्यांना स्टार लावले. पोलीस दलात कार्यतत्पर अशी ओळख असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक उत्तम डोईबळे, लोह्याचे भूमिपुत्र पोलीस उपनिरीक्षक भिमानंद महाबळे माजी सरपंच उद्धवराव झिंझाडे, यासह अनेकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

