
नवीन नांदेड| नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने बँकेचा वतीने जिल्ह्यातील सर्व शाखेला सुरक्षीत रक्कम वाढ करणयाचे आवाहन दिले होते यास सिडको शाखेच्या वतीने प्रतिसाद देत मार्च २३ अखेर ठेवी मध्ये वाढ झाली असून खातेदार सभासदांनी या ठेवीला प्रतिसाद दिला आहे.


नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शाखांना ठेव वाढीचे उदिष्ट देण्यात आले असून जुन २०२३ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने कर्मचारी यांना डिपॉझिट ठेव वाढीचे उदिष्ट देण्यात आले होते, जिल्ह्यात व लोहा तालुक्यातील एकमेव असलेल्या व बँकेच्या प्रत्येक आवाहनाला प्रतिसाद सिडको शाखेने या पुर्वी कर्जे थकबाकीदार यांना वसुलीसाठी वसुली चांगल्या पैकी केली आहे.


या शाखेत अंतर्गत न ऊ गावे समाविष्ट असुन मार्च अखेर ठेवीचे उदिष्ट व थकबाकी वसुली बाबत वसुली करण्यात आली असून उदिष्टपोटी ठेवी चांगल्या प्रमाणात वसुली केली असून सभासद खातेदार यांनी ठेवी उदिष्टाला प्रतिसाद दिला आहे. शाखेचे व्यवस्था विठ्ठल दिगंबर पोवळे, रोखपाल राजु देशमुख यांनी सभासद खातेदार यांच्याशी संपर्क साधून ठेव सुरक्षीत रक्कम साठी आवाहन केल्या नंतर या शाखेतील अनेक खातेदार सभासद यांनी प्रतिसाद देत शाखेला दिलेल्या मार्च अखेर उदिष्ट पुरती या शाखेने केली आहे.

