
लोहा| लोह्याचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांची शिक्षणाधिकारी (प्रा) या पदावर भंडार जिल्हा येथें पदोन्नती झाली. त्याच्या बदली व पदोन्नती मिळाल्या बद्दल लोहा तालुका शिक्षण विभागाच्या वतीने पारडी येथील विक्की गार्डन येथे कृतज्ञता गौरव सोहळा पार पडला.


उपजिल्हाधिकारी डॉ शरद मंडलिक, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, शिक्षणाधिकारी(मा) प्रशांत दिग्रसकर, नायब तहसीलदार राम बोरगावकर, उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, बीडीओ शैलेश वाव्हूळे, गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे, डायटच्या प्राचार्य जयश्री आठवले, सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी एम आर राठोड, श्री दवणे, यासह शिक्षण विस्तार अधिकारी , व शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी शिक्षक उपस्थित होते.


शिक्षणाधिकारी श्री रवींद्र सोनटक्के व त्याच्या सुविद्य पत्नी यांचा तसेच त्याचे आई वडील भाऊ-बहीण यांचा सत्कार करण्यात आला.खाजगी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक बोधगीरे, मुख्याध्यापक दामोधार वडजे, बी डी जाधव, बी बी खांडेकर, एच जी पवार, मुख्याध्यापक पवार, बालाजी गवाले यासह अनेकांनी सत्कार केला.


शिक्षणाधिकारी सोनटक्के यांनी लोह्यात बिईओ म्हणून केलेल्या कामाचा उपविभागीय अधिकारी डॉ मंडलिक, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी गौरव केला तसेच शिक्षणाधिकारी सोनटक्के यांनी आपणास या तालुक्यातील शिक्षक अधिकारी पदाधिकारी यासह सर्वांनी सहकार्य केले वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबविता आले सर्वांची साथ मिळाली येथील भूमीला मी कधीही विसरणार नाही एवढा मोठा कार्यक्रम शिक्षकांनी आयोजित केला त्याविषयी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविक बिईओ सतीश व्यवहारे यांनी केले संचलन रमेश पवार यांनी केले या सोहळ्याला तालुक्यातील सर्व शिक्षक मुख्याध्यापक कर्मचारी उपस्थित होत. तालुका नियोजन समितीच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला . शिक्षक संघटनेचे अशोक पाटील, बाबुराव फसमले, संतोष साखरे, पी डी पोले, बालाजी डफडे, मंगल सोनकांबळे, विठ्ठल चव्हाण, आर जी वाघमारे, दिलीप वाघमारे, अशोक आढाव, गजानन उप्परवाड, यासह शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
