
नायगाव, रामप्रसाद चनांवार। लोहगाव ता. बिलोली येथे रविवार, २ एप्रिल रोजी शेतकरी, कष्टकरी, शेत मजुरांसाठी मोफत मधुमेह, रक्तदाब तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संयोजक डॉ. दिलीप शिंदे लोहगावकर यांनी ही माहिती दिली.


राम नवमी निमित्त लोहगाव ता. बिलोली येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून प्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉ. महेश तळेगावकर तपासणी करणार आहेत. डॉ. तळेगावकर हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ‘ शेतकरी आरोग्य अभियान ‘ चालवतात. त्याच अभियानाच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पत्रकार तथा डिजिटल मिडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप शिंदे यांनी शिबिर आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे.


लोहगाव येथील ग्रामदैवत हनुमान मंदिर परिसरात रविवारी सकाळी ९ वाजल्यापासून शिबिराला सुरुवात होईल. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. दिलीप शिंदे, भगवान हांडे, दिलीप पांढरे , अमोल गोस्वामी, शशीकांत पोतदार, विलास चिंचोले, व्यंकटेश गंगमवार, नागनाथ वानोळे, पिंटु वानोळे, दत्ता टेंभुर्णीकर, नागनाथ , अनंतवाड, दत्ता वानोळे आदींनी केले आहे.


शोभायात्रा व धर्मसभा: रामनवमी निमित्ताने शनिवार दि. १ एप्रिल रोजी दुपारी गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे . तसेच संध्याकाळी ७ वाजता धर्म सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी श्री. ष. ब्र. १०८ विरूपाक्ष शिवाचार्य महाराज आणि हभप. कु. भक्तिताई जातेगावकर,बीड हे मार्गदर्शन करणार आहेत.
