
हिमायतनगर| औरंगाबाद विभागातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील इ.5 वी ते 8 च्या गुणवंत विद्यार्थ्यांची अंतरिक्ष केंद्र श्रीहरिकोटा, आंध्रप्रदेश येथे उपग्रह प्रक्षेपणाचा प्रत्यक्ष अनुभव, थुंबा येथील स्पेस म्युझियम, विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल अण्ड टेक्निकल म्युझियमचा प्रत्यक्ष अनुभव देणेसाठी शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात आले आहे.


विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा. संशोधनवृत्तीचा विकास व्हावा. विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांच्या कार्यपद्धतीची जवळून ओळख व्हावी. शास्त्रज्ञ निर्मितीस हातभार लागावा. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील संशोधन प्रक्रियेची माहिती मिळावी. याहेतूने अंतरिक्ष केंद्र श्रीहरिकोटा, आंध्रप्रदेश येथे गुणवत्तापूर्ण शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आयोजन केल्यास विद्यार्थ्यांना अधिक फायदा होईल. यादृष्टीने जिल्हा परिषद शाळांमधील इ. 5 वी ते 8 वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा स्तर, केंद्रसस्तर, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या. दि 10 मार्च 2023 रोजी झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेत जि.प.कें.प्रा.शाळा खडकी बाजार च्या मुलींनी घवघवीत यश संपादन केले.


हिमायतनगर तालुक्यातून श्रावस्ती चंदकांत भगत प्रथम क्रमांक व किरण बबन भगत हिने द्वितीय क्रमांक मिळवत हे यश संपादन केले. विशेष म्हणजे तालुक्यातुन निवड झालेल्या तिन पैकी दोन विद्यार्थीनीं या खडकी बा. शाळेच्या आहेत. या यशाबद्दलचे सारे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक श्री भूतनर सर व सर्व शिक्षक यांना जात असून, विशेष करून विज्ञान शिक्षक अमोल जाधव यांनी या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन यश मिळवण्यासाठी परिश्रम घेतले.


इस्त्रोच्या शैक्षणिक सहलीसाठी निवड झाल्याबद्दल हिमायतनगर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी शिवाचार्य साहेब,शिक्षण विस्तार अधिकारी डवरी साहेब, केंद्रप्रमुख डी.एल.रावते, मुख्याध्यापक एम.एस.भुतनर, शिक्षक एस.एम.रायवार ,जि.एन.राचुरे, एस.बी.इंगळे, आय.ए.पठाण, एन.पी. नागरगोजे,एस.एम.जाधव, श्रीमती माळी मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच सरपंच संजय सूर्यवंशी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तानाजी सोळंके, उपाध्यक्षा गजानन सूर्यवंशी यांनीही विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. श्रावस्ती व किरण या भगत भगिनींनी सहलीसाठी यश संपादन करुन शाळेचे व गावाचे नाव केले आहे. अशी भावना सर्व गावकऱ्यांनी बोलून दाखवली .
