
नांदेड। नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे नवनियुक्त शहर जिल्हाध्यक्ष मंगेश कदम व पत्रकार लोकेश कावळे यांचा भवरे परिवाराकडून नुकताच सन्मान व सत्कार करण्यात आला.


नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शहर जिल्हाध्यक्षपदी मंगेश कदम यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन तसेच,सा.वृत्त वारसदारचे विशेष प्रतिनिधी लोकेश दिलीपराव कावळे यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करुन भारतीय संविधान प्रास्ताविका प्रत भेट देऊन या दोघांचाही सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सुमनबाई मारोतीराव भवरे यांच्या हस्ते भवरे परिवाराकडून त्यांच्या निवासस्थानी दीपकनगर,तरोडा (बु.),नांदेड येथे सत्कार व सन्मान करण्यात आला.


यावेळी बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र व आ.माधवराव पा.जवळगांवकर मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा, सा.वृत्त वारसदारचे मुख्य संपादक त्रिरत्नकुमार मा.भवरे, मराठी पञकार परिषद मुंबई संलग्न, नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष व राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा. भवरे,सौ.सुर्यकांता लोणे, नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाच्या माजी जिल्हा कार्यकारिणी सदस्या सौ.उज्वला त्रिरत्नकुमार भवरे,सौ.दिपाली व दिलीपराव कावळे,रोहित कावळे,सुशीलकुमार भवरे, कु.श्रुतीताई भवरे, प्रफुल्लकुमार भवरे,नागेश कांबळे,युवक काॅग्रेसचे शहर महासचिव विक्की गायकवाड,ऍड.सुनील नागोरे,निक्की भवरे,अतिश चव्हाण आदींसह दीपकनगर तरोड्यातील नागरिक व महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

