
नांदेड| भुसावळ यार्डातील रेमोडेलिंगच्या कार्यामुळे हजूर साहिब नांदेड-अमृतसर हूजूर साहिब नांदेड सचखंड एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे, तो पुढील प्रमाणे –


दिनांक 30 आणि 31 मार्चला नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक 12715 हजूर साहिब नांदेड –अमृतसर सचखंड एक्स्प्रेस पूर्णा, अकोला, भुसावळ कोर्ड लाईन, खांडवा मार्गे धावेल. दिनांक 29 आणि 30 मार्चला अमृतसर येथून सुटणारी गाडी क्रमांक 12716 अमृतसर-हजूर साहिब नांदेड सचखंड एक्स्प्रेस खांडवा भुसावळ कोर्ड लाईन, अकोला, पूर्णा मार्गे धावेल.


संबलपुर एक्स्प्रेस ला एक महिन्या करिता दोन डब्बे वाढविले


हजूर साहिब नांदेड –संबलपुर – हजूर साहिब नांदेड एक्स्प्रेसला एक महिन्या करिता दोन डब्बे तात्पुरत्या स्वरुपात वाढविण्यात आले आहेत, ते पुढील प्रमाणे —

अनु क्र. | गाडी क्र. | कुठून–कुठे | वाढविण्यात आले डब्बे | दिनांक पासून |
01 | 20809 | संबलपुर –
हजूर साहिब नांदेड |
स्लीपर क्लास – 01 डब्बा
तृतीय श्रेणी वातानुकुलीत – 01 डब्बा |
02.04.2023 to 30.04.2023
|
02 | 20810 | हजूर साहिब नांदेड –संबलपुर | 03.04.2023 to 01.05.2023 |
संपर्क क्रांती एक्स्प्रेस ला भुसावळ येथे सहा महिन्याकरिता थांबा

हजूर साहिब नांदेड –हजरत निझामुद्दीन – हजूर साहिब नांदेड संपर्क क्रांती एक्स्प्रेस ला भुसावळ रेल्वे स्थानकांवर सहा महिन्याकरिता थांबा देण्यात येणार आहे, तो पुढील प्रमाणे —

अनु क्र. | गाडी क्र. | कुठून–कुठे | आगमन–प्रस्थान | सहा महिन्याकरिता तात्पुरता थांबा | दिनांक पासून |
1 | 12753 | हजूर साहिब नांदेड –हजरत निझामुद्दीन
संपर्क क्रांती एक्स्प्रेस (साप्ताहिक)
|
17.50/17.55 |
भुसावळ |
04.04.2023 |
6 | 12754 | हजरत निझामुद्दीन – हजूर साहिब नांदेड
संपर्क क्रांती एक्स्प्रेस (साप्ताहिक) |
14.20/14.25 | 05.04.2023 |