
उस्माननगर। विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात वावरताना जिद्द ,चिकाटी ,परिश्रम मनामध्ये इच्छा कायम ठेवून खेळाबरोबर अभ्यासाकडे लक्ष देऊन यश संपादन करता येते असे प्रतिपादन कंधार लोहा मतदारसंघातील लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या सुविद्य पत्नी शेकाप महिला प्रदेशाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी उस्माननगर येथील कार्यक्रमात केले .


उस्माननगर( मोठी लाठी) ता.कंधार येथील समता मा.व.उच्च मा. विद्यालय येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . येथे घेण्यात आलेल्या विविध खेळामध्ये निवड झालेल्या विद्यार्थीना शालेय साहित्याचे बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंधार – लोहा मतदार संघातील लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या सुविद्य पत्नी शेकाप महिला प्रदेश अध्यक्षा तथा सामाजिक कार्य कर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे ह्या होत्या. तर प्रमुख पाहूणे म्हणून माजी प्राचार्य तथा संचालक श्री शामसुंदर जहागीरदार गुरूजी, बा.दे.कुलकर्णी माजी प्राचार्य तथा शाळेचे सचिव, कमलाकर देशपांडे शाळेचे उपाध्यक्ष, अरूण देशपांडे, शाळेचे प्राचार्य गोविंद बोदेमवाड, बालाजी ईसादकर ( जिल्हाध्यक्ष शेकाप नांदेड तथा सामाजिक कार्यकर्ता हे कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.


या सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे पुजन करुन दिप प्रज्वलित करण्यात आले व शाळेतील विद्यार्थीनिने सरस्वतीचे स्तवन गित गावून स्वागत केले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ.आशाताई शिंदे यांचा शाळेच्या वतीने श्रीमती ज्योतीताई सिरसाळकर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. व प्रमुख पाहूण्याचा सत्कार करण्यात आला.यानंतर विद्यार्थ्यांना सौ.आशाताई शिंदे यांच्या हस्ते शालेय साहीत्याचे वाटप करण्यात आले .


यावेळी सौ.आशाताई शिंदे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की,आपण निवडलेले कोणतेही क्षेत्र असो शिक्षणच आपल्याला त्या त्या क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी मोठे योगदान देते .तुम्ही अभ्यास करून ऊंच शिखरावर जा,आई – वडीलाचे व आपल्या गुरूजीचे नाव उज्ज्वल करा असे प्रतिपादन केले व शाळेचे प्राचार्य गोविंद बोदेमवाड यांनी प्रस्ताविक करताना शाळेविषयी माहिती सांगत शाळेला अत्यवाश्यक असणाऱ्या गोष्टी विषयी निधीची मागणी केली होती.

याविषयाचा धागा पकडून आमदार स्थानिक निधीतून आपल्या शाळेसाठी दहा लाखापर्यंत निधी देण्याचा प्रयत्न करिन असे आश्र्वासन सौ.आशाताई शिंदे दिले .यावेळी प्रमुख पाहुणे श्यामसुंदर जहागीरदार गुरूजी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाळेचे कलाशिक्षक तथा पर्यवेक्षक राजीव अंबेकर यानी केले. व आभार प्रा. कटमवार यांनी केले. यावेळेस शाळेचे शिक्षक, शिक्षीका,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थ्यी व पत्रकार उपस्थित होते.
