
हदगाव, शे चांदपाशा। खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी (दि.२८) मुंबई येथे भेट घेऊन पैंनगंगा नदीस तीसरा कालवा घोषीत करावा आणि जेव्हा जेव्हे कॅनलला पाणी सोडले जाईल तेव्हा – तेव्हा पैंनगंगा नदिपात्रात पाण्याचा विसर्ग करावा अशी बैठकीत मागणी केली होती. खासदार हेमंत पाटील यांनी केलेली मागणी आणि कडक उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत पैनगंगा नदी पात्रात लगेचच पाण्याचा विसर्ग सुरु करण्याचे आदेश दिल्याने खासदार हेमंत पाटील यांच्या सततच्या मागणीला यश आले आहे.


इसापूर धरण उशाला असताना देखील उमरखेड, महागाव, पुसद या तालुक्यांसह कळमनुरी, हदगाव, हिमायतनगर आणि माहूर तालुक्यातील जनतेला उन्हाळा सुरु होताच शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी दूरपर्यंत भटकंती करावी लागत होती. या सात तालुक्यातील जनतेने खासदार हेमंत पाटील यांची भेट घेऊन उन्हाळ्यात शेती आणि गुराढोरांना पिण्याचे पाणी मिळावे अशी त्यांच्याकडे मागणी केली होती.


सात तालुक्यातील शेतकरी , कष्टकरी जनतेची मागणी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर मांडुन धरण जवळ असलेल्या नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी कुठेही भटकंती करावी लागु नये, त्यांना वेळेवर पाणी मिळावे अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या मागणीचा दखल घेत इसापूर धरणा खाली असलेल्या तालुक्यांच्या पैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्याचे आदेश दिले.


त्यामुळे नेहमी उन्हाळ्यात नदी पात्र कोरडे पडणाऱ्या उमरखेड, महागाव, पुसद या तालुक्यांसह कळमनुरी, हदगाव, हिमायतनगर आणि माहूर तालुक्यातील नदी पात्रात आता एैन उन्हाळ्यात देखील भरपुर पाणी सोडले जाणार असून, जेव्हा जेव्हा कॅनलला पाणी सोडले जाईल तेव्हा तेव्हा पैंनगंगेच्या नदिपात्रात पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.

हिंगोली लोकसभा मतदार संघ नांदेड-हिंगोली-यवतमाळ जिल्ह्यात विभागला गेलेला सर्वात मोठा मतदार संघ आहे. इसापूर धरणाच्या खाली येणाऱ्या हिंगोली, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यातील सात तालुक्यातील शेकडो गावाना आजही उन्हाळा आला की पिण्याच्या पाण्यापासून ते शेती आणि गुरु ढोरे जगवण्यासाठी पाण्यासाठी भटकंती करावी लागते. शेतकरी आणि सामान्य जनतेची पाण्यासाठी होणारी भटकंती कायमची थांबली पाहिजे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलुन इसापूर धरणाच्या खाली येणाऱ्या गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. ती पूर्ण झाली आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या सात तालुक्यातील जनतेला कायमचा दिलासा मिळाला आहे – खासदार हेमंत पाटील