
हिमायतनगर| वाढोणा शहरात श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने मर्यादा पुरुषात्तम प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. चैत्र शुद्ध नवमीला म्हणजे दि.३० गुरुवारी श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य रस्त्याने हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत प्रभू श्रीराम मूर्तीची ढोल ताश्याच्या गजरात भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे. Successful preparation of Maryada Purushattam Prabhu Shri Ram Janmotsav celebration on behalf of Sri Ram Janmotsav Committee in Himayatnagar – Wadhona city


यासाठी नुकतीच गावकरी युवकांनी श्री परमेश्वर मंदिरात बैठक घेऊन १२ फुट उंचीची मूर्ती तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथून खरेदी केली आहे. बुधवार दि.२९ रोजी सायंकाळी ४ वाजता प्रभू श्रीराम मूर्तीचे आगमन हिमायतनगर (वाढोणा) शहरात होताच ढोल ताश्याच्या गजरात मुख्य कमानीपासून श्री परमेश्वर मंदिरापर्यंत जय श्रीराम नामाचा जयघोष करत मूर्तीचे स्वागत करण्यात आले आहे. उद्या गुरुवारी सकाळी १० वाजता श्री रामजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने व विविध मान्यवरांच्या हस्ते मूर्तीची पूजा, आरती होईल.


त्यानंतर सकाळी ११ वाजता गुलाल पुष्पवृष्टी होवून श्रीराम जन्मोत्सव साजरा होईल. श्रीराम रक्षास्तोत्र पठण होताच भजनी मंडळ, ढोल ताश्याच्या गजरात शहरातून भव्य मिरवणूक प्रारंभ होईल. जय श्रीराम नामाचा जयजयकार करत शहरातील मुख्य रस्त्याने शोभा यात्रा काढण्यात येईल. यात्रेदरम्यान ठिकठिकाणी मिरवणुकीचे पुष्पवृहस्तीने स्वागत तसेच भाविक भक्ताकडून प्रसाद व सरबताचे वितरण केले जाणार आहे. या धार्मिक सोहळ्यात शहरातील व तालुक्यातील तमाम हिंदू बांधवानी सहभागी होऊन शोभा वाढवावी असे आवाहन सर्व हिंदू संघटनाच्या वतीने करण्यात आले आहे.


खा.हेमंत पाटील यांच्याकडून श्रीराम जन्मोत्सव शुभेच्छा व समितीला देणगी

हिमायतनगर शहरात उद्या मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्मोत्सव मोठया उत्साहात साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव निमीत्त समितीसह सर्व गावकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. उत्सव साजरा करताना पवित्र राखून शांततेत उत्सव साजरा करावा असे आवाहन करत त्यांनी श्रीराम जन्मोत्सव समितीचे तालुकाध्यक्ष शुभम गाजेवार यांच्याकडे ५१ हजार रुपये देणगी स्वीय्य सहाय्यक तथा जनसंपर्क अधिकारी गोविंद गोडसेलवार यांच्या हस्ते पाठविली आहे. हि देणगी शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी व ईतर मान्यवरांच्या हस्ते श्रीराम जन्मोत्सव समितीकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
