
नविन नांदेड| केंद्र शासनामार्फत दिनांक 7 मार्च ते 30 मार्च 2023 कालावधीत महिलांचा स्वच्छते मधील सहभाग व त्यांचे स्वच्छतेमधील नेतृत्व वृद्धिंगत करण्यासाठी “स्वच्छोत्सव २०२३” अभियान साजरा करण्यासाठी सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत पदयात्रा काढून या मोहिमेचा मुख्य उद्देश महिलांच्या स्वच्छतेमधील सहभागातून ते महिलांच्या नेतृत्वाखालील स्वच्छतेमध्ये झालेले संक्रमण साजरे करणे हा आहे.


त्या अनुषंगाने अभियानाची व्यापक प्रसिद्धी करणे व महिलांच्या स्वच्छतेमधील कामाकरिता प्रोत्साहन देण्याबाबत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत आज सकाळी 10:30 वाजता सिडको क्षेत्रीय कार्यालय परिसरात स्थानिक महिला, स्वयंसेवकांना, संस्थाना सहभागी करून स्वच्छता जागृती फेरी व स्वच्छता शपथ घेण्यात आली.


आयुक्त डॉ.सुनिल लहाने, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त स्वच्छता निलेश सुंकेवार, सहाय्यक आयुक्त डॉ.रईसोधदीन यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता जागृती रॅली सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत काढण्यात आली, यावेळी स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे, अर्जुन बागडी यांच्या सह स्वच्छता महिला पुरुष मोठया संख्येने सहभागी झाले होते. आजच्या या रॅलीत सामाजिक कार्यकर्ता विजयताई गोडघासे व बचत गटांच्या महिला व मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला

