
नांदेड| मास्टर्स गेम्स फेडरेशनद्वारे नाशिक येथे आयोजीत पाचव्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत जि. प. प्रा. शा. बेटसांगवी -१ येथील शिक्षक श्री चंद्रकांत व्यंकटराव लामदाडे यांनी 100 मी आणि 200 मी बेस्ट स्ट्रोक प्रकारात सुवर्ण पदक व 50 मी ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये रौप्य पदक व प्रमाणपत्र प्राप्त केले. राष्ट्रीय स्तरावरील या जलतरण स्पर्धेत तीन पदक प्राप्त केल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतूक होत आहे.


अखंड सराव व जिद्द यांच्या जोरावर हे यश प्राप्त केल्याचे लामदाडे यांनी सांगितले. पोहणे हा सर्वांगसुंदर व्यायाम आहे शारीरिक व मानसिक मजबूत राहायचे असल्यास नियमित पोहणे गरजेचे आहे सर्वानी लामदाडे सरांचा आदर्श घ्यावा असे मत लोहा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री व्यवहारे साहेबांनी व्यक्त केले.


त्यांच्या या यशाबद्दल विस्तार अधिकारी आंबलवाड मॅडम, केंद्रप्रमुख नागोराव जाधव शाळेतील शिक्षक उद्द्व् मुळे, शिवचंद्र कोडगिरे, गणेश बिजलगावे मालू जाधव तसेच शा. व्य .समिती अध्यक्ष श्री चंद्रकात् वानखेडे, बेटसांगवीचे सरपंच श्री राम वानखेडे सर व उपसरपंच श्री सदाशिव वानखेडे आदीनी सरांचे अभिनंदन केले.

