
नवीन नांदेड। नवीन नांदेड मराठी पत्रकार संघटनेच्ये माजी अध्यक्ष रमेश ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सिडको वृत्तपत्र विक्रेता टिन शेड सेंटर येथे टेबल पंखे देऊन सामाजिक बांधिलकी जोपासत वृत्तपत्र विक्रेता यांना मिठाई वाटप केली. यावेळी वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने भव्य सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.


सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या टिन शेड येथे उन्हाळ्यात होत असलेली गरमी पाहता वाढदिवसाच्या निमित्ताने नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर यांनी दोन टेबल पंखे भेट देऊन वृत्तपत्र विक्रेता बांधव यांना मिठाई वाटून सामाजिक बांधिलकी जोपासली या वेळी पत्रकार दिगंबर शिंदे, माजी सरपंच नागोराव अंबटवार,प्रा.शिंदे, प्रा. गादेकर, संजय कुमार गायकवाड,यांच्या सह वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्ये जेष्ठ विक्रेते दौलतराव कदम, मदनसिहं चव्हाण, शेख सयोधदीन, अध्यक्ष सतिश कदम, उपाध्यक्ष दिलीप ठाकूर, सचिव बालाजी सुताडे, राम धांवडे, साई गोटमवार, तात्या वाघमारे, व वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.

