
लोहा| स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात 1एप्रिल पासून ते 04 एप्रिल पर्यंत भारतीय जनता पार्टी शिवसेने तर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे लोहा कंधार विधानसभा क्षेत्रात ही गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. अशी माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी दिली.


काँग्रेसचे नेते राहुल गांधी व काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडून सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या सोबत उद्धव ठाकरे यांनी तोडून दाखवावीच, असे प्रवीण पाटील चिखलीकर यांनी प्रतिपादन केले पुढे त्यांनी सांगितले की, राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदार संघांतून सावरकर गौरव यात्रा प्रवास करेल.


4 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी या यात्रेचा समारोप होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपा – शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत.


लोहा कंधार तालुक्यात सावरकर गौरव यात्रा निघणार आहे. यात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर , भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणिताताई देवरे चिखलीकर ,भाजपाचे तालुका अध्यक्ष आनंदराव पाटील शिंदे शहराध्यक्ष किरण वट्टमवार रोहित पाटील अंडगेकर ,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बंडू वडजे दीपक कानवाटे, सचिन मुकदम, सूर्यकांत गायकवाड, भारत कदम, भानुदास पवार , अनिल धुतमल बाळू पवार यासह मान्यवर आदी उपस्थित होते.
