
उस्माननगर, माणिक भिसे। काटकळंबा ता.लोहा येथील रहिवाशी ज्येष्ठ नागरिक नारायणराव माधवराव पाटील पानपट्टे यांचे आज रामनवमीच्या पवित्र दिनी गुरूवारी 12.30 वा.दुःखद निधन झाले आहे . त्यांची अंत्य यात्रा उद्या शुक्रवारी दि.31.3.2023 रोजी सकाळी 11.00वा.मोजे काटकलंबा ता.कंधार येथे होणार आहे.


प्रतिष्ठित आणि सेवाभावी शेतकरी ,दूरदृष्टी असलेले शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्त्व, त्यांनी त्यांच्या कुटुंबात त्यांच्या व त्यांच्या भावांच्या सर्व मुलामुलींना शिक्षण देऊन सन्माननीय अधिकारी,उच्चपदस्थ कर्मचारी बनविले आहे…परिस्थितीवर मात करून, प्रसंगी दोन हात करून,त्या काळात मुलाबाळांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून,नांदेड सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी रूम करून उत्तम शिक्षण कसे मिळेल याची काळजी घेतली…त्यांना शिक्षणा बद्धल प्रचंड आस्था आणि जिव्हाळा होता,शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही अशी त्यांची धारणा होती.


शिक्षण हेआपल्या परिस्थीतीचे परिवर्तन करणारे एकमेव साधन आहे हे त्यांनी जाणले होते..म्हणून त्यांनी सर्व लेकराबाळाणा शाळा शिकविण्याचा ध्यास धरला…आणि त्यातूनच याची सर्वोत्तम फलनिस्पती म्हणजे त्यांच्या कुटुंबात आज घडीला ,5ते 6 अधिकारी आणि बाकी अनेक कर्मचारी आहेत… अत्यंत कष्टकरी शेतकरी,सोज्वळ वागणे ,मनमिळाऊ स्वभावाचे आहे. त्या परिस्थितीला तोंड देण्याची हिम्मत आणि धैर्य ,काटकसर करून उत्तम संसार करण्याचे स्वप्न,आणि संसाराबरोबर परमार्थ साधण्याची हातोटी,ते निस्सीम शंभू महादेवाचे भक्त होते…शेवट पर्यंत त्यांची शरीरयष्टी आतिशय निकोप आणि निरोगी राहिली..निकोप शरीरात निकोप मन वास करते हे ब्रीद त्यांनी जपले..काटकळंबा नगरीत नारायण पाटील ( आबा) या नावाने प्रसिद्ध होते.


त्यांच्या जाण्याने संपूर्ण गावात व पंच क्रोशित हळहळ व्यक्त होत आहे..पानपट्टे परीवाराचा आधारवड कोसळला . ते सेवा निवृत्त पोलिस निरीक्षक श्री बाबुराव पानपट्टे व पोलिस बीट जमादार श्री गोविंदराव पानपट्टे यांचे वडील आणि डॉ.संभाजी पानपट्टे आयुक्त मिरा भाईंदर म.न.पा.ठाणे व श्री शिवाजी पानपट्टे विस्तार अधिकारी ( पंचायत ) कंधार यांचे चुलते आहेत.त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली,नातवंडे पतवंडे,पुतणे पुतण्या,भावजय ,सूना, नातसूना, मुलेबाळे ,सगेसोयरे, भावकी,असा मोठा पानपट्टे परिवार काटकळंबा येथे आहे…
