
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| येथिल प्रभु श्रीरामजन्मोत्सव मिरवणुकीस खासदार हेमंत पाटिल यांनी अचानक पणे भेट देवुन मिरवणुकीत सहभाग घेतला, त्यामुळे अगोदरच प्रभु श्रीरामाच्या मिरवणुकीत भक्तीमय वातावरणात तल्लीन झालेल्या राम भक्तात खासदार पाटिल यांच्या भेटीमुळे आनखी उत्साह संचारल्याचे दिसुन आला.


हिंदु बांधवांच्या आस्थेचा विषय असलेली श्रीरामजन्मोत्सव मिरवणुक प्रतिवर्षी निघत असते, यंदा अयोध्येतील राममंदिर निर्माण कार्य पुर्ण रूप घेण्याकडे जात असतांना हिमायतनगर शहरात यावेळी रामभक्तांचा उत्साह अधिक दिसुन येत आहे. आजच्या मिरवणुकिच्या प्रारंभीच खासदार हेमंत पाटिल यांनी अनपेक्षीत पणे मिरवणुकीत सहभाग घेवुन राम भक्तांचा आनंद द्विगुणीत केला. सुरूवातीला प्रभु श्रीरामचंद्राच्या भव्य मुर्तीस खासदार हेमंत पाटिल, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख बाबुरावजी कदम कोहळीकर यांनी पुष्पमाला अर्पण करून चरणी गुलाब पुष्प वाहत नमस्कार केला.


त्यानंतर रामभक्तां सोबत मिरवणुकीत ठेका धरला, रामभक्तांनी खासदार पाटिल यांना डोक्यावर घेताच त्यांनी भगवा ध्वज हवेत फिरवला. यावेळी रामभक्तांनी जय श्रीराम एकच जयघोष करून वातावरण आनखी भक्तीमय करून टाकल. दरम्यान मिरवणुकीतील टाळ कऱ्यांसोबत खासदार हेमंत पाटिल यांनी टाळ वाजवुन प्रभु श्रीराम व हरी नामाचा गजर केला. एकुणच आजची खासदार पाटिल यांची हिमायतनगर श्रीराम जन्मोत्सव मिरवणुकी वेळेची भेट रामभक्तांचा उत्साह वाढवणारी ठरली.


यावेळी श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष शिवम गाजेवार, बाबुरावजी कदम कोहळीकर, परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष, महाविरचंद श्रीश्रीमाळ, शामजी रायेवार, अभियंता प्रविण जन्नावार, संतोष गाजेवार, कमलाकर दिक्कतवार, डॉ. राजेंद्र वानखेडे, जेष्ठ शिवसैनिक, बाळुअण्णा चवरे, शिवसेना तालुका प्रमुख, रामभाऊ ठाकरे, भाजपा ता. अध्यक्ष आशिष सकवान, युवासेना ता. प्रमुख बाळा पतंगे, मा. नगराध्यक्ष कुणाल राठोड, विजय वळसे, गजानन हरडफकर, राजु पाटिल भोयर, ज्ञानेश्वर पुट्टेवाड, वामनराव पाटिल, भाजपा यु.मोर्चाचे अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी, राजेश बोडके, संदिप अग्रवाल, विकास नरवाडे, निकु ठाकुर, राम नरवाडे, विठ्ठल ठाकरे, अनिल भवरे, परशुराम गौड, रामदास रामदिनवार, गजानन चायल, हिदायत खान, साईनाथ कप्पलवाड, शंकर भैरवाड, बालाजी करेवाड, यांचेसह असंख्य रामभक्त, शिवसैना पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
