
नांदेड। जिल्हा पोलीसदला तर्फे श्रीराम नवमी शोभा यात्रा संबंधाने नांदेड शहरामध्ये श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 29 मार्च 2023 रोजी पथसंचलन करण्यात आले.


पथसंचलन पोलीस स्टेशन ईतवारा येथून सुरवात होवून गाडीपुरा रेणुकादेवी मंदीर, जुना मोंढा टॉवर, महाविर चौक, वजिराबाद चौक, कलामंदीर, शिवाजीनगर, फुले मार्केट, आय.टी.आय. चौक, श्रीनगर, वर्कशॉप कॉर्नर, अशोकनगर राममंदीर येथे पथसंचलनाचा समारोप करण्यात आला.


या पथसंचलान रैलीमध्ये मा. श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, मा. डॉ. श्री खंडेराय धरणे, अपर पोलीस अधिक्षक, भोकर, मा. श्री गौर हसन, सहा. पोलीस अधिक्षक, अर्धापुर, श्रीमती शफकत अमना, सहा. पोलीस अधिक्षक, भोकर, मा. श्री चंद्रसेन देशमुख, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग, नांदेड शहर, मा. श्री सचिन सांगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग देगलुर, मा. डॉ. श्री सिध्देश्वर भोरे, पोलीस उप अधिक्षक इतवारा विभाग, मा. श्री विक्रांत गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग धर्माबाद, तसेच नांदेड शहरातील सर्व प्रभारी अधिकारी, नांदेड जिल्हयातील 191 पोलीस अधिकारी, 1120 पोलीस अंमलदार, 05 आर.सी.पी. प्लाटून, 500 होमगार्ड व परभणी जिल्हयातील 12 अधिकारी व 68 पोलीस अंमदार, लातुर जिल्हयातील 09 अधिकारी 67 अंमलदार, हिंगोली जिल्हयातील 05 अधिकारी 25 अंमलदार यांनी सदर पंथसंचलन मध्ये भाग घेतला.


मिरवणुकी मध्ये भाग घेणारे नागरिकांनी पोलीसांनी दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करून आनंद साजरा करावा कोणीही वाहनावर मर्यादेपेक्षा जास्त व्यक्ती बसवून फिरवू नये तसेच ट्रीपल सीट, वाहनाचे सायलन्सर काढुन कर्कश आवाज करून वाहन चालवूनये किंवा ठरवून दिलेल्या मिरवणुक मार्गाशिवाय इतरत्र मिरवणुक काढू नये, शांततेत सन उत्सव साजरा करावा नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. असे मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी आव्हान केले आहे.
