
नवीन नांदेड। हडको येथील राममंदिर येथे रामनवमी निमित्ताने महा अभिषेक, होम हवन, महाआरती व रामनवमी ऊत्साहात साजरी करण्यात आली यावेळी संजय पाटील घोगरे मित्र मंडळाच्या वतीने महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते.


रामनवमी निमित्ताने ३० मार्च रोजी हडको येथील राममंदिर येथे सकाळी अभिषेक, होम हवन यासह विधीवत महापूजा करण्यात आली, यावेळी राममंदिर अयोध्या नगर यांच्या वतीने विधीवत पुजन करण्यात आले.


यावेळी नारायणराव गुट्टे, बालाजी रहाटकर, उदयकुमार पाध्ये, भंडारी ताई, तममेवार, केरबा पाटील,संजय पाटील गोपाळचावडीकर, शिवाजी हंबरडे,कुलथे, मोतीराम पाटील, विनायक जोशी, रमेश जाधव, शिल्पकार भारत यांच्या सह अनिस घोगरे, उमेश स्वामी, सचिन गादेवाड,संतोष मुसळे, सुरेश मुसळे, अनसाजी पाटील घोगरे, व अयोध्या नगर मित्र मंडळ यांच्यी उपस्थिती होती. या वेळी संजय पाटील घोगरे मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी घेतला.

