
लोहा| व्यवसायात केवळ कमाई हाच हेतू न ठेवता सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक कुटुंब असतात .लोह्यातील कळसकर बंधू हे असेच गरिबीतून पुढे आलेला परिवार होय.त्यांना आजही परिस्थितीची जाणीव आहे.त्यामुळे दर पाडव्याला हॉटेल समोर मोफत मिनरल वॉटर पाणपोई लावला. गेल्या चाळीसहुन अधिक वर्षापासून बालाजी कळसकर-विठ्ठल कळसकर व बंधू हे कार्य अविरतपणे कोणताही गाजावाजा न करता तहानलेल्याना शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करण्याचे काम करीत आहेत.


लोहा शहरात बस स्टँड समोर कळसकर बंधू यांचे हॉटेल आहे. जर एखाद्या भुकेलेला हॉटेल मध्ये जेवला आणि त्याच्याकडे पैसे नाहीत तर कधीच कळसकर बंधूनी अशा व्यक्ती सोबत कधीच बिलासाठी वाद घातला नाही उलट तसा व्यक्ती पुन्हा बिल आणून देतात. शहर व परिसरातील अनेक गावांत बालाजी कळसकर त्याचे बंधू विठ्ठल कळसकर, मारुती कळसकर, राजू कळसकर व व्यंकट कळसकर या भावंडा विषयी लोकांनाही आदरभाव आहे.


गेल्या पाच दशका पासून ते हॉटेल व्यवसायात आहेत. दरवर्षी नित्यनेमाने गुढी पाडवा झाला की, हॉटेल समोर बालाजी कळसकर व बंधू मोफत पाणी पोई लावतात.पाणी टंचाई काळात विकत पाणी घेऊन तर आजच्या बदलत्या काळात फिल्टर पाणी विकत घेऊन कळसकर हे पाणी पोई चालवितात.दररोज किमान चाळीस -पन्नास (आठवडी बाजार ) जार म्हणजे बॉटल लागतात.थंड पाणीची बॉटल वीस रुपयाला मिळते. म्हणजे दररोज आठशे ते हजार रुपये खर्च पाण्यावर होतो.पण हे कार्य त्यांनी स्वीकारले आहे.


सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे त्यासाठी कोणताही गाजावाजा बालाजी कळसकर व त्याचे बंधू यांनी कधीच केला नाही. तहानलेला पोटभर पाणी पितो व दुवा देतो. तर बसस्थानकात सुद्धा पूर्वी विठ्ठल कळसकर व आता राजू शेठ कळसकर हे प्रवाशांसाठी मोफत पाणी देतात विशेष म्हणजे बसस्थानकात पाण्याची सोय नसते.कँटीग मध्येही मिनरल वॉटर असते ते साधे व मिनरल पाणी विकत घेतला. गेल्या चाळीसाहून अधिक वर्षा पासून लोकांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणाऱ्या या कळसकर बंधू मुळे वाटसरूची तहान भागविली जाते हे तसे पुण्याचेच काम होय.
