
हिमायतनगर, अनिल मादसवार| सद्गुरू बाबा महाराज सातारकर यांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या हिमायतनगर तालुक्यातील मौजे बोरगडी येथील मारुतीरायाच्या मंदिरात हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य श्रीराम कथा, अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुरुवात चैत्र शुद्ध नवमी दि.३० गुरुवार पासून झाली आहे. मारोतीरायाचा जन्मोत्सव सोहळा दि.०६ एप्रिल गुरुवारी पुरोहित कांतागुरू वाळके यांच्या मंत्रोच्चार वाणीत सकाळी ५.३० वाजता होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत हभप गणेश महाराज राठोड कोल्हारीकर यांचे कीर्तन संपन्न होणार आहे. सप्ताहाचा समारोप दि.०७ एप्रिल शुक्रवारी कुस्त्यांची दंगल व महाप्रसादाने होणार आहे. उत्सव काळात पंचक्रोशीतील भाविक – भक्तांनी उपस्थित राहून हनुमंतरायाचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर कमेटी आणि गावकर्यांनी नांदेड न्युज लाईव्हच्या माध्यमातून केले आहे.


हिमायतनगर तालुक्यातील नवसाला पावणाऱ्या मारोतीरायाचे मंदिर विदर्भ – मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक राज्यासह महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. प्रतिवर्षी बोरगडी येथे जन्मोत्सव निमित्ताने हजारो भाविक भक्त उपस्थित होऊन आपली मनोकामना पूर्ण करतात. ज्यांची इच्छा पूर्ण झाली ते भाविक पुरण पोळीचे नैवैद्य हनुमंतरायला चढवितात. हनुमान जन्मोत्सव निमित्त बोरगडी येथील मारोतीरायाच्या मंदिरात हरिनाम सप्ताह कार्यक्रम हभप. माधव महाराज बोरगडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे. या निमित्त होणाऱ्या महाप्रसादाच्या कार्यात गणेश नाव जाधव यांच्या प्रित्यर्थ अर्जुन गणेश जाधव बोरगाडी तांडा नंबर २ यांच्यातर्फे २० हजार, इस्लापूर येथील नितीन बालकिशन मेहेत्रे यांच्याकडून ५ क्विंटल तांदूळ व ९० किलो तूरडाळ, सुभाषराव पंतमवाड यांच्यावतीने २१०० रुपये, मनीषा मुळे यांच्याकडून १५०० तर राजेश हनमल्लू यांच्यातर्फे थंड पेयजल वितरित केले जाणार आहे. तसेच कला प्रसादासाठी राजूअप्पा बाबूअप्पा बंडेवार यांचे सहकार्य लाभणार आहे.


रामनवमी दि.३० पासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सकाळी ९ ते ११ या वेळेत हभप ज्ञानेश्वर महाराज बोरगडीकर यांच्या मधुर वाणीत संपन्न होती आहे. तसेच रात्री ८ ते १० या वेळेत हभप. पांडुरंग महाराज येळेगावकर, यांचे हरिकीर्तन झाले असून, हभप. डॉ.लक्ष्मीकांत रावते ढाणकीकर, निळोबा महाराज हरबळकर, हभप.सुदाम महाराज पिंपळदरीकर, हभप. सुनील महाराज लाजूळकर, हभप. नारायण महाराज सोंडेगावकर, हभप गणेश महाराज राठोड यांचे कीर्तन होणार आहे. दि.०६ एप्रिल म्हणजे गुरुवार रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळा असल्याने पुरोहित कांतागुरू वाळके यांच्या मंत्रोच्चार वाणीत सकाळी ५.३० वाजता अभिषेक महापूजा होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत हभप गणेश महाराज कोल्हारीकर यांचे कीर्तन संपन्न होणार आहे. तर रात्री ८ ते १० या वेळेत हभप.सदानंद महाराज फळेकर यांचे हरिकीर्तन होणार आहे. हनुमान जन्मोत्सव दिनी आ.माधवराव पाटील जवळगावकर, माजी आ.नागेश पाटील आष्टीकर व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांची उपस्थिती लाभणार आहे.


दि.०७ हनुमान जन्मोत्सव सोहळ्याच्या समारोप दिनी हभप.सदानंद महाराज फळेकर यांचे काल्याचे कीर्तन सकाळी ९ ते ११ वाजेच्या दरम्यान होणार असून, त्यानंतर भव्य महाप्रसाद होणार आहे. दुपारी १२ ते ०२ वाजेच्या दरम्यान कठाळ्याची हर्राशी त्यानंतर दुपारी कुस्त्यांची दंगल सुरु होणार आहे. याचे उद्घाटन व बक्षीस वितरण श्रीरंग माधवराव काईतवाड व प्रेमराव सेवा राठोड पोलीस पाटील यांच्या हस्ते केले जाणार आहे. यात जिंकणाऱ्या मल्लास ४००१ रुपयाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस, दुसर्या क्रमांकास २००१ रुपये व तिसर्या क्रमांकाच्या मल्लास १०११ रुपयाचे बक्षीस दिले जाणार आहेत. तसेच या व्यतिरिक्त अन्य ११०१ रुपयाच्या २ आणि १००१ रुपयाच्या ५ कुस्त्या होतील तर ७०१ रुपयाच्या पाच कुस्त्या खेळल्या जातील असेही संयोजक व गावकऱ्याच्या वतीने प्रसिद्धी पत्रकातून सांगण्यात आले आहे. यात्रा महोत्सव व हनुमान जन्मोत्सव सप्ताहाचे आयोजन श्री, मारोती मंदिर कमेटी व श्री चैतन्य सांप्रदाय प्रसार संस्था उपशाखा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
