
नांदेड। मिसिंग प्रकरणातील महिलेचा शोध घेण्यासाठी झालेला खर्च व ताब्यातील मोबाईल परत देण्यासाठी1 हजाराची लाच मागणाऱ्या विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक पोलिस उपनिरीक्षक अशोक रामराव कुरुळेकर यांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रामनवमीच्या दिवशी रात्री ताब्यात घेतले आहे. 1 हजाराची लाच अंगलट आली असल्याने नागरिकांचा पोलिसांवर असलेल्या विश्वासाला तडा जात असल्याचे यावरून दिसते आहे.


याबाबत सविस्तर वृत असे की, तक्रारदार हे त्यांच्या मित्रांचे वाहनांवर चालक म्हणुन तीन महिन्यापूर्वी नांदेड येथुन भोकर येथे गेले होते. सदर वाहनात त्यांच्या मित्रासोबत एक महिला होती. त्यातील महिला ही मिसिंग असल्याचे पोलीस स्टेशन विमानतळ येथे तक्रार आली होती. सदर महिलेचा शोध घेण्यासाठीचे प्रकरण लोकसेवक पोलीस उपनिरीक्षक अशोक रामराव कुरुळेकर,वय 53 वर्षे, यांचेकडे देण्यात होते. तक्रारदार यांना विचारपूस करण्यासाठी पोलीस स्टेशन विमानतळ येथे बोलावुन घेऊन त्याचा मोबाईल आणि आधार कार्ड ताब्यात घेतले होते. काही दिवसानंतर ती महिला मिळून आल्याने तक्रारदार त्याचा मोबाईल व आधारकार्ड परत घेण्यासाठी आरोपी लोकसेवक यांच्याकडे जाऊन मिसिंग महिला परत आली आहे आता माझा मोबाईल व आधारकार्ड परत द्या म्हणुन मगील तीन महिन्यापासून विनंती करत होता.


तेव्हा पोलीस उपनिरीक्षक अशोक रामराव कुरुळेकर,वय 53 वर्षे,
यांनी तक्रारदार यांना मिसिंग महिलेचा शोध घेण्यासाठी खूप खर्च झाला आहे. म्हणुन तुम्ही रु. 1,000/- घेऊन या आणि मोबाईल व आधारकार्ड परत घेऊन जा म्हणुन पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस उपनिरीक्षकास ताब्यात घेतले असुन, याबाबत पोलीस स्टेशन विमानतळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही कार्यवाही मार्गदर्शक डॉ.राजकुमार शिंदे पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड, पर्यवेक्षण अधिकारी:-
श्री राजेंद्र पाटील, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड यांनी सापळा/तपास अधिकारी श्री. जमीर नाईक, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड, सापळा कारवाई पथक पोलीस निरीक्षक श्री गजाजन बोडके, नानासाहेब कदम, पोना राजेश राठोड,पोकॉ अरशद खान, रितेश कुलथे, चापोना प्रकाश मामुलवार अँटी करप्शन ब्युरो, युनिट नांदेड यांनी केली.

या घटनेनंतर नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा. डॉ राजकुमार शिंदे,पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड परिक्षेत्र,नांदेड, मोबाईल क्रमांक 9623999944 राजेंद्र पाटील, पोलिस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड, मोबाईल क्रमांक – 7350197197, कार्यालय दुरध्वनी – 02262-253512, @ टोल फ्रि क्रं. 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

रामनवमी निम्मित नांदेड जिल्हा पोलीस खडा पहारा देत रोड वर उभे असतांना झाला ट्रॅप, या महिन्यातील पोलीस खात्याला डाग लावणारी ही 4 थी घटना झाली असून, फक्त मोबाईल परत देण्यासाठी 1000 रुपयेची लाच मागणी अंगलट विमानतळ पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत कुरुळेकर यांच्यावर आली, सकाळी 6 वाजेपर्यंत ACB चा तपास पूर्ण झाला आहे. यामुळं नागरिकांचा पोलीस खात्यावरील विश्वास उडत चालला असल्याचे दिसून येत आहे.