
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। श्रीक्षेत्र ईकळी माळ येथील महान संत श्री पर्वतेश्वर महाराज यांच्या जीवन चरित्रावर उमरी शहरातील सेवानिवृत्त शिक्षक एस. ए. जोशी यांनी ओवीबद्ध ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथाचे प्रकाशन गुरूवारी करण्यात आले.


याप्रसंगी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प समाधान महाराज भोजेकर, ह. भ. प. बाबू महाराज काकांडीकर, आमदार राजेश पवार, राजेश कुंटूरकर, गंगाधर पाटील, मनोज आरगूलवार, ईकळीकरचे पोलीस पाटील, पञकार बाळासाहेब पांडे, नरेंद्र येरावार इजतगावकर पाटील, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. एस.ए. जोशी उमरीकर यांनी श्री संत पर्वतेश्वर महाराज यांच्या जीवन चरित्रावर ओवीबद्ध ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथात संत श्री पर्वतेश्वर महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्यात आला आहे.


प्रती शिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईकळी माळ येथे रामनवमीनिमित्त आणि संत श्री परबतेश्वर महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त गेल्या आठ दिवसापासून कीर्तन महोत्सव सुरू आहे.राम जन्म सोहळा कीर्तन महोत्सवात किर्तन सेवा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. समाधान महाराज भोजेकर यांची होती..किर्तना नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते जवळ पास पस्तीस हजार च्या वर भाविकांनीप्रसादाचा लाभ घेतला विशेष म्हणजे उमरी येथील दोन हजार भक्त गणांनी पहाटे उमरी ते इकळी पायी दिंडी आणली होती.अखंड हरिनाम सोहळ्या निमित्त आयोजित आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.


सोपान महाराज सानप यांचे काल्याचे कीर्तन दि.३१मार्च शुक्रवार सकाळी १० ते १२ ह.भ.प.सोपान महाराज सानप यांच्या काल्याचे किर्तनाने व महाप्रसादाने या अखंड हरिनाम सोहळ्याची व गेल्या दहा दिवसा पासून चालेल्या भव्य कार्यक्रमाची सांगता झाली.
