Tuesday, June 6, 2023
Home कंधार भाजपा -शिवसेनेतर्फे राज्यव्यापी सावरकर गौरव यात्रा – भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर -NNL

भाजपा -शिवसेनेतर्फे राज्यव्यापी सावरकर गौरव यात्रा – भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर -NNL

by nandednewslive
0 comment

कंधार, सचिन मोरे। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात ३० मार्च पासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेने तर्फे सावरकर गौरव यात्रा लोहा कंधार विधानसभा क्षेत्रात काढण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी दिली. ही यात्रा ६ एप्रिल पर्यंत चालणार आहे. नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे, असे ही ते म्हणाले.

राहुल गांधी व काँग्रेस च्या अन्य नेत्यांकडून सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसबरोबरची युती उद्धव ठाकरे यांनी तोडून दाखवावीच, असे आव्हानही चिखलीकर यांनी दिले.

राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांतून सावरकर गौरव यात्रा प्रवास करेल. ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी या यात्रेचा समारोप होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपा – शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत.

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार होणारा अपमान सत्ता टिकवण्यासाठी निमूटपणे सहन केला. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार सोडून दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला रस्त्यावर उतरून जोडे मारले होते. तशी हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवायला हवी होती असेही प्रवीण पाटील चिखलीकर यांनी नमूद केले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर , भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणिताताई देवरे चिखलीकर ,भाजपाचे तालुका अध्यक्ष भगवान राठोड, भाजपाचे माजी नगरसेवक कृष्णा पापीनवार शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार, भाजपयुवा मोर्चा तालुका अध्यक्ष साईनाथ कोळीगीरे, शहर सरचिटणीस मधुकर डांगे, शिक्षक आघाडीचे तालुका अध्यक्ष राजहंस शहापुरे शहर उपाध्यक्ष महेश मोरे, बालाजी पवार बाळू धुतमल आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!