
नवीन नांदेड। कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण जांगेसाठी धनेगाव ग्रामपंचायत मतदारसंघातून गंगाधर (पिंटू )पाटील शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला या वेळी उपस्तित आमदार मोहन अण्णा हंबर्डे, यांच्या सह महा विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.


कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूकीसाठी ग्रामपंचायत मतदारसंघातून धनेगाव ग्रामपंचायत चे संरपच गंगाधर पिंटु पाटील शिंदे यांनी दि. ३१ मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला, यावेळी नांदेड दक्षिण मतदारसंघाचे आ. मोहनराव हंबर्डे,शिवसेना ऊध्दव ठाकरे गटाचे भुजंग पाटील, बबन बारशे ,माधव पावडे ,काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष मनोहर पाटील शिंदे ,माजी सरपंच भुजंगराव भालके धनेगाव, चेअरमन बालाजी पाटील शिंदे ,व्हाईस चेअरमन नितीन पाटील शिंदे, यांच्या सह ग्रामपंचायत मतदारसंघातील अनेक मतदार व मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होता.

