
नांदेड| भारतीय बौद्धिक एवं सांस्कृतिक पुनर्स्थापन मिशन अंतर्गत भारतामध्ये केंद्र शासनाच्या वतीने वेदांता मिशन राबविण्यात येत आहे या अंतर्गत विविध मंदिरांचा जिर्णोद्धार पुनर्वसन व भारतीय संस्कृतीमध्ये असलेले अनेक असे स्मारक उभारण्याचं काम या मिशन अंतर्गत होत आहे. यामध्येच बिहार येथील पटनामध्ये वेदांता मिशन ऑफ इंडिया अंतर्गत 51 शक्तिपीठ आंतरराष्ट्रीय देऊळ ची निर्मिती पटना जवळ दादूपूर येथे करण्यात येत आहे.


सदरील मंदिरासाठी उपलब्ध केलेले जमिनीचे भूमिपूजन रामनवमी व चैत्र नवरात्रीनिमित्त 30 मार्च 2023 रोजी 51 महिलांच्या हस्ते झालं. या 51 महिलेमध्ये नांदेड येथील सुप्रसिद्ध कलावंत व तृतीय पंथी कार्यकर्ता डॉ. सान्वी जेठवाणी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांनी सर्व महिलांसोबत बसून भूमिपूजन मध्ये सहभाग नोंदवला व यज्ञामध्ये आहुती दिली. आपण अतिभाग्यशाली आहोत की भारतामध्ये एवढा मोठा मंदिरच्या निर्माण कार्यामध्ये आपलं हात लागत आहे व आपल्या हस्ते भूमिपूजन होत असल्याने ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे असं त्यांनी पत्रकारांना सांगितले.


याच दिवशी सायंकाळी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं यामध्ये सान्वी जेठवाणी यांनी महाराष्ट्राची परंपरा असलेले लोककला गोंधळ जागरण सादर केले. त्यांच्या या सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले व त्यांना खूप प्रतिसाद मिळाला यासोबतच वेदांत मिशन ऑफ इंडियाचे महासचिव सुनील कुमार सिंग यांनी डॉ. सान्वी जेठवाणी यांना भारतीय कला संरक्षण व तृतीयपंथी समाजसेवेसाठी राष्ट्रीय महिला शक्ती सन्मान 2023 ने सन्मानित केलं.


यावेळेस अनेक मान्यवर बिहार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, महापौर प्रयागराज येथील आदी शंकराचार्य यांच्या उपस्थितीत त्यांना माताची चुनरी सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं. सान्वी जेठवाणी समाजकार्यात अग्रेसर असून सांस्कृतिक कार्यामध्ये वेगळा ठसा उमटवण्याचे काम पुन्हा एकदा करत आहेत त्यामुळे नांदेडकरांनी त्यांचे खूप अभिनंदन केले आहे.
