
लोहा| नगर पालिकेच्या साडे चार वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार यांची लोहा शहर काँग्रेस अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या संमतीने जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. त्याच्या निवडीमुळे काँग्रेस पक्षात नगर पालिका निवडणूक तोंडावर येत्या काळात प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या कुंपणावरील लोकांची मोठी गोची झाली.


सोनू संगेवार हे अभ्यासू व कल्पक युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाते.मागील काळात २०१३ते२०१८ या सलग पाच वर्षात ते उपनगराध्यक्ष होते .त्यांची राजकीय सुरुवात २००८ मध्ये शिवसेना पक्षातून नगरसेवक म्हणून झाली.माजी आ रोहिदास चव्हाण यांच्या सोबत त्यांनी काम केले आहे. शहरात प्रत्यक्षात वृक्ष लागवड व संवर्धन केले. वाचनालय अद्यावत व्हावे यासाठी त्यांनी त्याच्या काळात पुस्तके खरेदी केली. अनेक विधायक कामांची नोंद त्याच्या नावावर आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी माजी मंत्री डी. पी.सावंत, आ. मोहन अण्णा हंबर्डे, माजी आ अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष नागेलीकर, तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार , माजी नगरसेवक पंकज मोटरवार, उपस्थित होते.


सोनू संगेवार यांच्या निवडी बद्दल त्याचे शहरात जंगी स्वागत करण्यात आले. पक्ष नेतृत्वाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू असे नवनियुक्त शहराध्यक्ष सोनू संगेवार मित्रपरिवारांनी शुभेच्छा दिल्या तालुकाध्यक्ष शरद पवार व सोनू संगेवार हे एकमेकांचे कट्टर विरोधक पण आता काँग्रेस मध्ये तालुका व शहर अध्यक्ष पदावर नियुक्त झाले आहेत .हा राजकीय योगयोग होय.

