
नांदेड। शहरात चैनस्नॅचिंग व मोबाईल स्नॅचिंग करणारे गुन्ह्यातील आरोपीतांना अटक करून त्यांच्याकडून १ लक्ष ३४ हजार ५०० रूपयेचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. ही कार्यवाही शिवाजीनगर येथील गुन्हे शोध पथकाने केली असुन, याबद्दल सर्व स्तरातून उत्कृष्ट कामगीरीचे अभिनंदन केले जाते आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक १९/१०/२०२१ रोजी सकाळी ०७.०० वाजण्याचे सुमारास बाफना ब्रिजवरून स्कुटीवर जाणारी महिलेच्या गळयातील तिन तोळे सोन्याचे गंठन किमंत १,२०,००० /- रूपयाचे तिन अनोळखी इसमांनी मोटार सायकलवर येवुन जबरीने हिसकावुन घेवुन पळुन गेल्याचे तक्रारीवरून पोस्टे शिवाजीनगर येथे गुरन ३९४ / २१ कलम ३९२, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सदर गुन्हयाचा तपास चालू असतांना दिनांक २३/३/२०२३ रोजी रात्री कोंबीग व ऑल आउट ऑपरेशन चालु असतांना पोलीस निरीक्षक, मोहन भोसले पो स्टे शिवाजीनगर व गुन्हे शोध पथकास मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे संशयीत आरोपी १ . अतिष जिवनसिंह ठाकुर रा. असदवन, ०२. निखील सुरेश कुंटूरकर रा. कौठा नांदेड ०३. कमलेश उर्फ आशु पाटील पि. बालाजी लिंबापुरे रा. वसरणी यांना ताब्यात घेवुन त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्याचेकडुन गुन्हयातील गेला माल १,२०,००० /- सोन्याची चैन जप्त करण्यात आली आहे.


तसेच दिनांक १४/०३/२०२३ रोजीचे सकाळी लॉ कॉलेज समोर एका इसमास आडवुन दोन अनोळखी इसमांनी येवुन खंजरचा धाक दाखवुन त्याचेकडील ओपो कंपनीचा १४५०० रूपयाचा मोबाईल जबरीने हिसकावुन घेवुन पळुन गेल्याचे घटनेत गुरन ८२ / २३ कलम ३९४, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला, सदर गुन्हयातील आरोपीची सुध्दा गोपनिय माहिती काढुन, आरोपी १ . चारूदत्त उर्फ चा- या प्रदिप मईंग रा. गोकुळनगर नांदेड व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन गुन्हयातील १४,५०० /- रूपयाचा मोबाईल जप्त करून चांगली कामगीरी केली.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार व उप विभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख, पोलीस निरीक्षक मोहन भोसले, पोलीस स्टेशन शिवाजीनगर यांचे मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोउपनि रोडे व गुन्हे शोध पथकातील पोलीस उप निरीक्षक मिलींद सोनकांबळे, अमलदार शेख इब्राहीम, दिलीप राठोड, रविशंकर बामणे, देवसिंग सिंगल, शेख अझहर, दत्ता वडजे, विष्णु डफडे, विशाल अटकोरे यांनी पार पाडली.
