
उस्माननगर, माणिक भिसे। इस्लाम धर्मात पवित्र रमजान महिण्याला अनन्य साधारण महत्व प्राप्त आहे. या महिन्यात सर्वच मुस्लिम बाधंवाना रोजा फर्ज सक्तिचे असतात, लहानापासून ते मोठ्यांपर्यंत या महिन्यात रोजा धरला जातो . पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची आवड निर्माण होत असते . त्यामुळे लहान चिमुकले, चिमुकली हि मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा धरतात.


असाच प्रकारे उस्माननगर ता.कंधार येथील कुरेशी गल्लीतील मोहम्मद नविद वल्द महेबुब खुरेशी वय आठ वर्षांच्या या चिमुकल्यानी पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून (दि. ३०) मार्च शुक्रवारी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा रखरखत्या उन्हातही दिवसभर अन्नाचा कण व पाण्याचा एक थेंब न घेता काटेकोरपणे यशस्वी पूर्ण केल्याबद्दल नातेवाईक व मित्रांनी मोहम्मद नविद कुरेशी यांचा रमजानचा पहिला उपवास असल्याने त्यांची रोजारखई करून त्याचे कौतुक व अभिनंदन करत आहे.

