
हदगाव, शे.चांदपाशा| शासनाने एसटी बसेस मध्ये महीलांना ५०%टक्के सवलत दिल्याने हदगाव तालुक्यात महिला प्रवाशामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ‘वाट पाहील माञ बसनेच जाईन ‘असा एक प्रकारची महीला मध्ये जिद्द दिसुन येत आहे. या प्रवासा मध्ये काही वयोवृध्द जोडप्याची संख्या वाढत असुन एका सीटवर ‘मालकांची जागा’ आहे. म्हणुन सीट राखीव करत आहे. या मुळे हदगाव शहराच्या अगारातुन सुटणा-या बसेस ‘हाऊसफुल्ल ‘होत आहेत. परंतु यामुळे खाजगी वाहनधारकांना जबरदस्त ‘फटका’ बसत आहे. एसी महामंडळास पूर्व दिवस आणायचे असल्यास आता शासनाने आता तेलंगणाच्या धर्तीवर महामंडळ बसस्थानकाच्या सुधारणेकडे लक्ष देऊन प्रवाश्याना सुरक्षित प्रवास व सुविधांची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे.


यापुर्वी शासनाने ६५ वर्षावरिल जेष्ठ नागरिकांना प्रवासा मध्ये ५०%सवलत दिली होती. त्यानंतर ७५ वर्षावरील वृद्धाना मोफत एसटी प्रवास योजना… त्यानंतर महीला सन्मान योजनाद्वरे ५०%टक्के सवलत योजना सुरु केली. यामुळे महीला वर्गात समाधन व्यक्त करण्यात येत आहे. यापुर्वी तालुक्यातुन बाहेर गावी प्रवास करतांना बस वेळेवर न आल्यास एसटी बसेसची वाट न पाहता खाजगी वाहनाचा आसरा घेत होते. आता शासनाने महीलाना भरघोस सवलत दिल्याने याचा मोठा फटका खाजगी वाहनांना बसलेला आहे. परिणामस्वरुप खाजगी वाहनाना अपेक्षित असे प्रवाशी मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. खाजगी वाहनाद्वरे प्रवास करणा-या महीला सुरक्षित आणि सवलतीचा म्हणून आता एसटी प्रवास करतांना दिसुन येत आहेत.


बस्थानक बनले ‘कचरा डेपो…शासनाने लक्ष द्यावे..!
हदगाव शहरातील एसटी बस्थानकाच्या परिसरात कचरा डेपो झाल्याचे घाणरडे चिञ पाहायला मिळत आहे. या परिसरात मातीचे ढिगारे साचले असुन, मुतारी असुनही अनेक महाभाग ओपन जागेमध्ये लघुशंका करतांना दिसुन येतात. त्यामुळे बस्थनाकात घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. प्रवांशाना या दुर्गधीचा ञास सहन करावा लागत आहे. या बाबतीत आगार प्रमुखांचे माञ दुर्लक्ष असल्याचे दिसुन येत आहे. हि बाब लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांनी याकडे लक्ष देऊन प्रवाश्याना जशी तिकिटात सवलत दिली तशी एसटी महामंडळाच्या खिळखिळ्या झालेल्या बसेसमध्ये सुधारणा करून बसस्थानकाच्या जीर्णोद्धाराकडे लक्ष देऊन तेलंगणाच्या धर्तीवर प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी व सुविधेसाठी ठोस पाऊले उचलावीत अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.

