
अर्धापूर। अहिंसा परमो धर्मची शिकवण देणारे जैन धर्माचे चोविसावे तीर्थकार भगवान वर्धमान महावीर यांच्या जयंतीनिमित्त लहान येथील जैन मंदिर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


तालुक्यातील लहान येथील जैन मंदिर येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही भगवान महावीर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले असून गावातील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.


सोमवारी पहाटे महिला व भाविकांच्या उपस्थितीत अभिषेक पुजा,ग्रंथपठण, भजन,कीर्तन होणार आहे. तद्नंतर जैन मंदिर येथून भजन मंडळीसह भ.महावीर जींचा जयघोष करत गावात पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.जयंती सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन शाम शर्मा,ॠषभकुमार बाकलीवाल जैन, महावीर बाकलीवाल,आशिषकुमार कासलीवाल, विजयकुमार पहाडे, अंकुशशेठ कासलीवाल यांनी केले आहे.

