
बिलोली| शहरातील राज्य स्मारक असलेल्या ऐतिहासिक मस्जिद कला व दर्गा ही काळ्या दगडात कोरीव नक्षिकाम केलेली वास्तू असून आमच्या वडीलोपार्जित असलेले येथे कुलदैवत आहे.येथील मस्जिद कला व दर्गा ची सर्वे न.५७७,५८०ची राज्य महामार्गा लगत ईनामी जमीन असून येथील स्थानिक भूमाफिया/दर्गाचे स्वयं घोषित वारसदार यांनी या पवित्र जमिनीवर अवैध अतिक्रमण करून टिन शेडचे दुकाने व शौकत मंगल कार्यालय थाटून भाड्याने दिले आहे.जे कि अनधिकृत आहे हे सर्व अतिक्रमण काढुन सदरिल जागा खुली करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे खा.प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे बिलोली भाजप युवा मोर्चाचे बिलोली ता.उपाध्यक्ष साईराज रुद्रुरकर यांनी केली आहे.


हिंदु-मुस्लिम सह सर्व समाजाचे पर्यटक व श्रद्धालू येथील दर्गाचे दर्शन घेण्यासाठी येतात.येथे नवस फेडण्यासाठी बक-याची कंदोरी केली जाते.पण येथे भाविकांसाठी निवास व्यवस्था, पिण्याचे पाणी,बाथरूम,शौचालय आदी कोणतीच सोयी सुविधा उपलब्ध होत नसून येथील समस्यांचा ञास श्रद्धालू,पर्यटक यांना सहन करावा लागत आहे.या परिसरात ईनामी जागेवर झालेले अतिक्रमणाबाबत गेल्या काही महिन्यापासून येतील काही नागरिकांनी विविध शासकिय कार्यालयात तक्रार करण्यात आली होती.त्या तक्रारीची दखल घेत बिलोली चे मंडळ अधिकारी यांनी ईनामी खिदमत माश जागेवर प्रत्यक्ष जाऊन तेथे केलेल्या अवैध अतिक्रमण व अनधिकृत बांधकामा संदर्भात वास्तुनिष्ट अहवाल तयार करुन तहसिल कार्यालयाला दिला असून या अहवाला नुसार येथील लोकांनी विनापरवानगी दुकाने थाटली आहे.


तसेच कागदपञांची मागणी केली असता एकाही व्यक्तिंने जमिनीची मालकी असलेली कागदपञ दिली नाही.त्यामुळे या ईनामी जागेवर असलेली सर्व दुकाने, मंगलकार्यालय हे अनाधिकृत असल्याचे लिखीत स्वरुपात लिहुन दिले आहे.या अहवालानुसार सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग नांदेड व मुख्यकार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद यांना सदरील ईनामी जमीन मधील सर्व अवैध अतिक्रमण काढून ही जागा श्रद्धालू,पर्यटकांसाठी खुली करून येथील जिर्ण झालेल्या पुरातन वस्तू कलाकृती ची तात्काळ प्रशासनातर्फे डागडुजी करण करणे अत्यंत आवश्यक असल्याची मागणी निवेदनाद्वारे भाजपा युवा मोर्चाचे साईराज रुद्रुरकर यांनी खासदारांकडे केली आहे.

